लखनऊ 01 मे : देशात कोरोनानं (Coronavirus)हातपाय पसरले आहेत. अशात बेड मिळवण्यासाठी रुग्णालयांबाहेरही मोठमोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. या संकटकाळात काही रुग्णालयं मात्र नातेवाईकांकडून मोठी रक्कम वसूल करत आहेत. अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयानं (Private Hospital) सरकारनं निश्चित केलेल्या दरापेक्षा 20 पट अधिक पैसे रुग्णाच्या कुटुंबीयांकडून घेतले आहेत. हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशच्या मथुरा येथील.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, 42 वर्षीय हेमलता अग्रवाल यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मथुरामधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, काही तासाच्या उपचारानंतरच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णालयानं एका दिवसाच्या उपचारासाठी कुटुंबीयांकडून 3.7 लाख रुपये घेतले.
मथुराचे जिल्हा दंडाधिकारी नवनीत सिंह चहल यांनी खासगी केडी मेडिकल कॉलेजच्या विरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी सांगितलं, की या रुग्णालयाविरोधात कठोर कारवाई केली जाईल. या संकटाच्या काळात रुग्णाच्या कुटुंबीयांकडून अधिकचे पैसे वसूल करण्यात रुग्णालय कोणतीच कसर सोडत नाहीये.
बाहुबलीचा कोरोनामुळे अंत! मोहम्मद शहाबुद्दीनचा मृत्यू, तुरुंगात भोगत होता शिक्षा
रुग्णालय सुरुवातील संपूर्ण 6.75 लाख रुपये देण्यास नकार देत होतं. जे रुग्णाला दाखल करताना कुटुंबीयांनी जमा केले होते. डॉक्टर आणि रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये झालेल्या बोलण्याचा एक ऑडिओ व्हायरल झाला. यानंतर रुग्णालय प्रशासनानं पीडित कुटुंबाला 3 लाख रुपये परत केले.
अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन, 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
केडी रुग्णालयाचे मालक मनोज अग्रवाल यांनी सांगितलं, की त्यांनी डॉ. भल्ला यांच्या ऑडिओ रेकॉर्डिंगबाबत ऐकलं आहे. त्यांनी सांगितलं, की या घटनेबाबत संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या डॉ. भल्ला दिल्लीमध्ये आहेत. ते माघारी येताच याबाबत त्यांच्यासोबत बोलेल. पुढे त्यांनी असाही दावा केला, की सरकारनं ठरवलेल्या दरांमध्येच कोरोना रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.