Home /News /national /

बाहुबलीचा कोरोनामुळे अंत! खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचा मृत्यू

बाहुबलीचा कोरोनामुळे अंत! खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असणाऱ्या मोहम्मद शहाबुद्दीनचा मृत्यू

राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचा (Former RJD MP Mohammad Shahabuddin) दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यानं त्याला उपचारासाठी दिल्लीत दाखल करण्यात आले होते.

    नवी दिल्ली, 1 मे : राष्ट्रीय जनता दलाचा (राजद) माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनचा (Former RJD MP Mohammad Shahabuddin) दिल्लीतील रुग्णालयात मृत्यू झाला आहे. कोरोनाची लागण (Corona Infection) झाल्यानं त्याला उपचारासाठी दिल्लीत दाखल करण्यात आले होते. एका खून प्रकरणात दिल्लीच्या तिहार कारागृहात तो शिक्षा भोगत होता. मोहम्मद शहाबुद्दीन बिहारमधील सिवान मतदारसंघाचा माजी खासदार होता असून तो सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक झाली होती. त्यानंतर त्याला दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, आरजेडीचा हा बाहुबली नेता एका खून प्रकरणात दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत होता. शहाबुद्दीनची तब्येत अचानक बिघडल्यानंतर तुरुंग प्रशासनाने चौकशी केली असता त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यानंतर कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली त्यामुळे त्याला दिल्लीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, प्रकृती जास्तच बिघडत असल्यानं व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. कालपासून तब्येत आणखीनच खराब होत गेली आणि आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. हे वाचा - Coronavirus: कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4 लाखाचा टप्पा जन्मठेपेची शिक्षा झाली होती शहाबुद्दीनवर 30 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 15 फेब्रुवारी 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्याला बिहारच्या सिवान कारागृहातून तिहार येथे आणण्याचे आदेश दिले. तिहारच्या आधी त्यांनी बिहारमधील भागलपूर आणि सीवानच्या तुरूंगातही दीर्घकाळ शिक्षा भोगली होती. 2018 मध्ये जामीन मिळाल्यानंतर तो तुरूंगातून बाहेर आला, परंतु जामीन रद्द झाल्यामुळे त्याला पुन्हा तुरूंगात जावे लागले. गेल्या वर्षी वडिलांचे निधन झाले यापूर्वी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये माजी खासदार शहाबुद्दीनचे वडील शेख मोहम्मद हसीबुल्ला (वय 90 वर्ष) यांचं निधन झालं. त्यावेळी तिहारमध्ये शिक्षा भोगत असताना शहाबुद्दीनला पॅरोलवर आणण्यास परवानगी नव्हती. खून प्रकरणात तिहार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीनवर तीन डझनहून अधिक फौजदारी खटले दाखल आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, RJD

    पुढील बातम्या