मुंबई 01 मे : देशात कोरोनानं अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णसंख्येतील वाढीसोबतच मृतांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशात आता बॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन झालं (Bikramjeet Kanwarpal dies of Covid-19) आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
बिक्रमजीत कंवरपाल 2002 साली मेजरच्या पदावरून सेवानिवृत्त झाले. यानंतर 2003 मध्ये त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पेज 3, रॉकेट सिंग, आरक्षण, मर्डर 2, 2 स्टेट्स आणि गाझी अॅटॅकसारख्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. बिक्रमजीत कंवरपाल यांचा हिमाचल प्रदेशमध्ये जन्म झाला. त्यांचे वडील द्वारकानाथ कंवरपाल हेदेखील सैन्यात अधिकारी होते. बिक्रमजीत यांना अभिनयाची आवड असल्यानं सेवानिवृत्तीनंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या काळात त्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
Sad to hear about the demise of actor Major Bikramjeet Kanwarpal this morning due to #Covid. A retired army officer, Kanwarpal had played supporting roles in many films and television serials. Heartfelt condolences to his family & near ones.
ॐ शान्ति ! 🙏 — Ashoke Pandit (@ashokepandit) May 1, 2021
चित्रपटांशिवाय त्यांनी अनेक दिया और बाती हम, ये हैं चाहते आणि दिल तो दिल हैं यासारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत. हॉटस्टारच्या Special Ops या वेबसीरिजमध्ये ते शेवटचं झळकले. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक उत्तम अभिनेता गमावल्याचं म्हणतं हळहळ व्यक्त केली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Corona patient, Coronavirus, Death