लखनऊ, 14 जून : उत्तर प्रदेशाची (Uttar Pradesh News) राजधानी लखनऊमध्ये 16 वर्षांच्या मुलाने आईच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आतापर्यंत हत्येमागे पबजीची कहाणी (PUBG Story) सांगितली जात होती. मात्र नाव न छापण्याच्या अटीवर कुटुंबातील एका सदस्याने सांगितलं की, पबजीची कहाणी तयार करण्यात आली आहे. हत्येच्या मागे एक व्यक्ती असून पोलीस छुपेपणाने त्याचा तपास करीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 जूनच्या रात्री आरोपी मुलाने वडिलांना फोन केला होता. फोनवर ते 49 सेकंद बोलले. यावेळी मुलाने सांगितलं की, त्याने आईची हत्या केली आहे. यावेळी वडिलांनी विचारलं की, आईचा मृतदेह (16 years boy killed mother) दाखव. यानंतर कॉल कट झाला. यानंतर मुलाने व्हिडीओ कॉल केला आणि त्या खोलीचा दरवाजा उघडला. जेथे महिलेचा कुजलेला मृतदेह पडला होता.
वडिलांना व्हिडीओ कॉल, डायनिंग टेबलवर ठेवली पिस्तूल...
यादरम्यान आरोपी मुलाने खोलीतून पिस्तूल उचलली. ज्याने आईला गोळी घातली होती. ही पिस्तूल वडिलांना दाखवत तो खोलीतून बाहेर गेला. यानंतर पिस्तूल डायनिंग टेबलवर ठेवली. यानंतर दोघांमध्ये तब्बल अर्धातास बातचीत झाली. या अर्ध्या तासात दोघांमध्ये काय बोलणं झालं, याबाबत सवाल उपस्थित केला जात आहे. आज तकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पोलीस आणि कुटुंबात अशी काहीतरी बातचीत झाली, जे गूढ बनलं आहे. यादरम्यान कुटुंबातील लोक पोलिसांच्या कारवाईमुळे असंतुष्ट आहेत. कुटुंबीयांनी सांगितलं की, पोलीस म्हणाले की, एकतर काही मोटीव्ह सांगा, किंवा जे काही सांगितलं जात आहे त्यात सहमती दाखवा. यानंतर पोलिसांनी पबजीची कहाणी सादर केली. आतापर्यंत ज्या गोष्टी समोर आल्या आहेत, त्यानुसार पोलीस हत्येचं मुख्य कारण कुटुंब, समाजासमोर आणू इच्छित नाहीत. कारण ते हत्येच्या दु:खापेक्षाही अधिक धक्कादायक असू शकतं.
काय आहे घटनाक्रम :
आईला का आणि कधी मारलं?
उत्तर - आरोपी मुलाने पोलिसांना सांगितलं की, शनिवारी (4 जून 2022) रात्री तीन वाजता त्याने आईची हत्या केली. आईने शनिवारी रात्री आठ वाजता त्याच्यावर 10 हजार रुपये चोरी करण्याचा आरोप केला होता. काही वेळानंतर पैसे सापडले होते. मात्र आई त्यालाच चोर समजत होती. यानंतर कपाटातून त्याने पिस्तूल काढली. त्यात नेहमी एक गोळी लोड केलेली असते.
दुसऱ्या दिवशी घरी आलेल्या मित्राने विचारलं की, खोलीतून दुर्गंधी येत आहे. घरासमोरील जमा झालेलं पाण्यातून दुर्गंधी येत आहे. यानंतर त्याने रूम फ्रेशनरने स्प्रे केला. मध्ये मध्ये तो दुसऱ्या खोलीत जाऊन बहिणीला धमकी देत होता. मित्र असेपर्यंत त्याच्या खोलीत येऊ नये.
हत्येनंतर काय केलं?
रविवारी संपूर्ण दिवस तो घरातच होता. सायंकाळी मित्रासोबत क्रिकेट खेळायला गेला होता. बाहेर जाताना बहिणीला शेजारच्या काकूंपाशी सोडलं. त्यांना सांगितलं आई बाहेर गेलीये. रात्री परतला तर मित्रासोबत लॅपटॉपवर सिनेमा पाहिला. आरोपीने पुढे सांगितलं की, आई रागाच्या भरात मारून टाकेन असं म्हणायची. म्हणून मीच तिला मारल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितलं.
कोणता गेम खेळत होता?
सुरुवातील आरोपी शांत होता. नंतर म्हणाला की, पबजी गेमचा नवीन बॅटल ग्राऊंड गेम होता. हा गेम खेळत होता. यामुळे अभ्यास होत नव्हता. शाळेतून तक्रारी येत असल्याने आई मोबाइल रिचार्ज करीत नव्हती. शाळेतून वारंवार तक्रार येत असल्याचं त्याच्या वडिलांनीही पोलिसांना सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mother killed, Murder, PUBG, Uttar pradesh news