लखनऊ, 13 जून : काही दिवसांपूर्वी पबजी गेम (PUBG Game) खेळण्यास नकार दिल्याने लखनऊमध्ये (Uttar Pradesh News) आपल्या आईची हत्या करणाऱ्या 16 वर्षीय आरोपी मुलाने आतापर्यंत अनेक धक्कादायक खुलासे (Shocking) केले आहेत. त्याचं म्हणणं आहे की, पबजीबद्दल केल्या जाणाऱ्या गोष्टी काल्पनिक आहेत. बाल सुधार गृहात काऊन्सिलिंग (Counseling at a juvenile detention center) समितीसमोर मुलाने सांगितलं की… पबजी गेमची कहाणी पोलिसांनी तयार केली आहे. आणि मला त्याने काही फरक पडत नाही. याशिवाय समितीने आरोपी मुलाची तीन तासांपर्यंत काऊन्सिलिंग केलं. आणि आता समितीचं म्हणणं आहे की, हत्येत तिसरी व्यक्तीदेखील उपस्थित होती. ज्यावर मुलाचा विश्वास होता. कारण दोन दिवसांपर्यंत मृतदेहासोबत राहणं सोपं नव्हतं. या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, समितीसमोर 16 वर्षांच्या मुलाने त्याच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी व्यक्त केल्या. ही वेळ त्याच्यासाठी अत्यंत त्रासदायक असल्याचं तो म्हणाला. आईच्या हत्येचा पश्चाताप नसल्याचंही तो यावेळी म्हणाला. जो रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार मुलगा आपल्या बहिणीसाठी खूप संवेदनशील होता. आणि आईच्या हत्येनंतर त्याने आपल्या बहिणीची काळजी घेतली. पुढे काऊन्सिलिंग समितीने सांगितलं की, मुलगा जिद्दी आणि महत्त्वाकांक्षी असून संवदेनशीलही आहे. कारण घरात आईचा मृतदेह असताना त्याला आपल्या 10 वर्षांच्या बहिणीची चिंता होती. त्याने स्वत: स्वयंपाक करून तिला जेवू घातलं. त्याने बहिणीची काळजी घेतली. आता समितीचं म्हणणं आहे की, जर तो आरोपी मानसिकतेचा असता तर आईसोबत बहिणीची हत्या करून घरातून पळून गेला असता. कारण या प्रकरणात त्याची बहिण प्रत्यक्षदर्शी होती. पुढे समितीचं म्हणणं आहे की, एका सर्वसामान्य व्यक्तीसाठी दोन दिवसांपर्यंत मृतदेहासोबत राहणं कठीण आहे. त्यामुळे यावेळी तिसरी व्यक्तीदेखील असल्याची शक्यता आहे. ज्यामुळे मुलांना मृतदेहासोबत राहणं सोपं झालं. एकंदर सर्व प्रकरण पाहता त्यावेळी घरात आरोपी आणि त्याच्या बहिणीशिवाय आणखी एक व्यक्ती असल्याची शक्यता समितीकडून व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.