Home /News /crime /

पोलीस अधिकाऱ्याने आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर सासऱ्याची केली हत्या

पोलीस अधिकाऱ्याने आधी प्रेयसीवर झाडली गोळी, नंतर सासऱ्याची केली हत्या

गोळीबार करून संदीप फरार झाला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    नवी दिल्ली, 29 सप्टेंबर : आपल्या महिला सहकाऱ्यावर गोळी झाडून हत्येचा प्रयत्न केल्यानंतर फरार झालेल्या दिल्ली (Delhi Police) पोलीस दलातील उपनिरीक्षकाने हरियाणा येथील रोहतकमध्ये जावून आपल्या  60 वर्षीय सासऱ्याचीही हत्या केल्याची घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षक संदीप दहिया (Sub Inspector Sandeep Dahiya) असं या आरोपीची नाव आहे. संदीप हा उत्तर दिल्लीतील अलीपूर भागात आपल्या महिला सहकाऱ्यासोबत गेला होता. तिथे कुठल्या तरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर संदीपने कारमध्येच तिच्यावर गोळीबार करून पसार झाला. आई आणि भाऊ रात्री कामाला गेले, पत्नी घरी असताना झोपेतच मयूरसोबत घडले भीषण... दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  गोळीबार करून संदीप फरार झाला होता. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीपला अटक करण्यासाठी पथक रवाना करण्यात आले आहे. संदीपची पत्नी राहत होती वेगळी! दिल्ली पोलिसांच्या सूत्रांना सोमवारी हरियाणा पोलिसांकडून माहिती मिळाली की, उपनिरीक्षक संदीपने ज्या महिलेवर गोळीबार केली ती त्याची प्रेयसी होती. संदीपच्या पत्नीनेच ही माहिती पोलिसांनी दिली होती. त्याच्या अनैतिक संबंधामुळे त्याच्यापासून ती वेगळी राहत होती. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या अडचणीत वाढ, पुणे कोर्टानं फेटाळला जामीन संदीपने याआधीही पत्नीच्या वडिलांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर संदीपने आपल्या प्रेयसीवर गोळीबार केल्यानंतर हरियाणामध्ये पोहोचून सासऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. घराबाहेर साफसफाई करत असताना संदीपने गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. रस्त्यावर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फूटेजमध्ये संदीपची गाडी आढळून आली होती. प्रेयसीवर गोळीबार करून झाला फरार संदीप दहियाने रविवारी रात्री उत्तर दिल्लीमधील अलीपूर भागात आपल्या महिला सहकाऱ्यावर गोळी झाडली होती. त्यावेळी त्याच भागात  शाहाबाद पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जयवीर यांनी जखमी अवस्थेत त्या महिला रुग्णालयात दाखल केले होते. वाटेत जात असताना तिने संदीपने आपल्यावर गोळी झाडल्याचे सांगितले. जयवीर हे पेट्रोलिंग करत होते, तेव्हा ही महिला त्यांना जखमी अवस्थेत आढळून आली होती. वहिनीला कंटाळून दीर पोहचला कोर्टात, म्हणाला-घाणेरडे VIDEO दाखवून... आरोपी संदीप दहिया हा लाहोरी गेट पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होता. जखमी महिला आणि संदीप या दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. पोलीस उपनिरीक्षक असल्यामुळे संदीपकडे पिस्तुल होती. दोघेही पेट्रोलिंगसाठी रात्री ड्युटी लावण्यात आली होती. पण संदीप ड्युटीवर आलाच नाही. त्यानंतर ही  घटना समोर आली.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या