मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

1 हत्या, 2 आरोपी, 170 CCTV कॅमेरे, 230 जणांची चौकशी; अखेर असं फुटलं आरोपींचं बिंग

1 हत्या, 2 आरोपी, 170 CCTV कॅमेरे, 230 जणांची चौकशी; अखेर असं फुटलं आरोपींचं बिंग

आरोपीनं सांगितंल, की तो दिल्लीमध्ये (Delhi) आला आणि डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. याचदरम्यान तो एका मुलीच्या संपर्कात आला. लॉकडाऊनच्या काळात तो कानपूरला परतला आण् गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) त्याचा ब्रेकअप (Breakup) झाला

आरोपीनं सांगितंल, की तो दिल्लीमध्ये (Delhi) आला आणि डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. याचदरम्यान तो एका मुलीच्या संपर्कात आला. लॉकडाऊनच्या काळात तो कानपूरला परतला आण् गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) त्याचा ब्रेकअप (Breakup) झाला

आरोपीनं सांगितंल, की तो दिल्लीमध्ये (Delhi) आला आणि डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. याचदरम्यान तो एका मुलीच्या संपर्कात आला. लॉकडाऊनच्या काळात तो कानपूरला परतला आण् गर्लफ्रेंडसोबत (Girlfriend) त्याचा ब्रेकअप (Breakup) झाला

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 12 ऑगस्ट : दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) एका हत्येच्या प्रकरणाचा (Murder Case) उलगडा करण्यात मोठ्या प्रयत्नांनंतर यश आलं आहे. या प्रकरणाच्या उलगड्यासाठी पोलिसांनी अनेक शहरांमध्ये जात चौकशी केली आणि अखेर 600 किलोमीटर दुरून आरोपींना अटक केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. अटक झाल्यानंतर आरोपींनी सांगितलं, की हत्येसाठी त्यांनी ऑनलाईन शॉपिंग अॅपच्या (Online Shopping App) माध्यमातून बटनवाला चाकू मागवला होता. या हत्येचं कारण ठरली एक मुलगी, जी आरोपीची एक्स गर्लफ्रेंड (Ex Girlfriend) होती.

ही घटना 4 ऑगस्टची आहे. आउटर दिल्ली जिल्ह्यात एका युवकाची हत्या झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी मंगोलपुरी ठाण्याच्या जवळ पार्किंगसमोरच वाई-ब्लॉक पार्कमध्ये सैफ नावाच्या एका युवकाची चाकू मारून हत्या करण्यात आली होती. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा युवकाचे नातेवाईक त्याला आधीच रुग्णालयात घेऊन गेले होते. मात्र, डॉक्टरांनी सैफला मृत घोषित केलं. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता समजलं की पार्कमध्ये बिल्ला आणि एका तरुणानं सैफवर हल्ला केला होता. या माहितीनंतर मंगोलपुरीमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राहत्या घरी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, 20 सेकंदात मारेकरी फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा तपास सुरू होता. पोलिसांनी कानपूर आणि फतेहपूरमध्येही आरोपींच्या नातेवाईकांच्या घरी जात तपासणी केली. यादरम्यान टेक्निकल सर्व्हिलान्समुळे आरोपींचं लोकेशन समजलं. पोलिसांनाही हेदेखील समजलं, की घटनेनंतर केट्स रुग्णवाहिकेच्या एका नंबरवर फोन केला गेला होता. आंबेडकर रुग्णालयातील जखमींना दिल्लीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्याबाबत कंट्रोल रुममधून एक कॉल आला होता. पोलिसांना समजलं, की घटनेत दोन हल्लेखोरही जखमी झाले होते आणि दोघांवरही सफदरगंज रुग्णालयात उपचार करण्यात आले. यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी आरोपी उत्तर प्रदेशात पळून गेले.

पोलिसांनी उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये जात तपास केला. अखेर 600 किलोमीटर प्रवास केल्यानंतर आरोपी बाराबंकी येथे दिसले. यादरम्यान पोलिसांच्या टीमनं अनेक ठिकाणी छापे मारले, जवळपास 170 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फुटेज तपासलं. 230 जणांकडे चौकशी केली. अखेर बाराबंकी बस स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमुळे दोन्ही आरोपींचा तपास लागला. 10 ऑगस्टला सकाळी साडेअकरा वाजता पोलिसांनी दोन्ही आरोपींना आनंद विहार बस स्टँडवरुन अटक केली.

इस्रायलवर चीनचा Cyber Attack : गोपनीय माहिती चोरली, संशय इराणकडे वळवण्याचा प्रयत

पोलिसांनी हत्येप्रकरणी आरोपी असद उर्फ बिल्ला आणि त्याच्या एका अल्पवयीन सहकाऱ्याला अटक केली. आरोपी असद यानं चौकशीत असं सांगितलं, की त्यानं नववीपर्यंत शिक्षण घेतलं, यानंतर तो दिल्लीमध्ये आला आणि डिलिव्हरी बॉयचं काम सुरू केलं. याचदरम्यान तो एका मुलीच्या संपर्कात आला. लॉकडाऊनच्या काळात तो कानपूरला परतला आण् गर्लफ्रेंडसोबत त्याचा ब्रेकअप झाला. काही काळानंतर त्याला समजलं, की एक सैफ नावाचा व्यक्ती त्याच्या एक्स गर्लफ्रेंडसोबत बोलतो. यानंतर बिल्लाला राग आला आणि त्यानं दिल्लीत येत सैफला असं न करण्याचा इशारा दिला. सैफनं हे न ऐकल्यानं बिल्लानं ऑनलाईन शॉपिंग अॅपवरुन एका चाकू खरेदी केला आणि आपल्या अल्पवयीन मित्रासोबत मिळून आधी सैफला पार्कमध्ये बोलावलं आणि नंतर चाकूनं भोसकून त्याची हत्या केली.

First published:

Tags: Crime news, Murder news