जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / राहत्या घरी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, 20 सेकंदात मारेकरी फरार

राहत्या घरी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, 20 सेकंदात मारेकरी फरार

राहत्या घरी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, 20 सेकंदात मारेकरी फरार

‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची (Software engineer) त्याच्या घरात घुसून गोळ्या घालून हत्या (murder) करण्यात आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पटना, 11 ऑगस्ट : ‘वर्क फ्रॉम होम’ (work from home) करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरची (Software engineer) त्याच्या घरात घुसून गोळ्या घालून हत्या (murder) करण्यात आली आहे. बिहारच्या (Bihar) हाजीपूरमध्ये सुमन शेखर (वय 30) (Suman Shekhar) हा काम करत असताना मारेकरी घरात घुसला आणि त्याने सुमनवर दोन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्याच्या डोक्यात लागली तर दुसरी गोळी  डोक्याला घासून गेली. या घटनेत सुमनचा मृत्यू झाला. सुमन घरात एकटाच असल्यामुळे जवळपास 7 तास या घटनेची कुणालाही कल्पना आली नाही. जेव्हा शेजारी राहणारा माळी जेवण देण्यासाठी त्याच्याकडे आला, तेव्हा त्याला सुमनचा मृतदेह दिसला आणि त्याने पोलिसांना याची कल्पना दिली. खुनाची पार्श्वभूमी सुमन शेखरचा 2 वर्षांचा मुलगा आहे. त्याची पत्नी गर्भवती असल्यामुळे ती मुलासह माहेरी गेली होती. त्यामुळे सुमन सध्या घऱी एकटाच होता. तिसऱ्या मजल्यावर तो राहत असे. पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारा सुमन कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून घरातूनच काम करत होता. शेखरला एकूण 4 भाऊ असून तो सर्वात धाकटा होता. त्याचा मोठा भाऊ संतोष सिंह उर्फ हाथीची 18 नोव्हेंबर 2018 या दिवशी गोळ्या घालून  हत्या करण्यात आली होती. महत्त्वाचं म्हणजे त्याची पत्नीदेखील माहेरी गेली असतानाच त्याची हत्या झाली होती. तर त्याचा दुसरा भाऊ त्याच्या पत्नीच्या हत्येच्या आरोपात दोषी आढळल्यामुळे सध्या तुरुंगात आहे. पोलिसांना मिळालं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना या हत्येप्रकरणी महत्त्वाचं सीसीटीव्ही फुटेज मिळालं असून त्यात चेहरा झाकलेला एका बंदूकधारी सुमनच्या फ्लॅटमध्ये शिरताना आणि बाहेर पडताना त्यात दिसत आहे. सकाळी 9.15 वाजता ही घटना घडली आहे. हे फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलं असून केवळ 20 सेकंदात मारेकरी गोळी मारून बाहेर पडल्याचं त्यात दिसत आहे. पोलीस या प्रकऱणाचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात