मराठी बातम्या /बातम्या /nagpur /

नागपुरात डॉक्टरानं वृद्धेला दिलं दुसऱ्यांदा जीवदान; शस्त्रक्रियेविनाच बदलली हृदयाची झडप

नागपुरात डॉक्टरानं वृद्धेला दिलं दुसऱ्यांदा जीवदान; शस्त्रक्रियेविनाच बदलली हृदयाची झडप

Nagpur News: नागपुरातील एका डॉक्टरानं 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या हृदयाची झडप शस्त्रक्रिया न करताच बदलली (changed heart valve without any surgery) आहे.

Nagpur News: नागपुरातील एका डॉक्टरानं 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या हृदयाची झडप शस्त्रक्रिया न करताच बदलली (changed heart valve without any surgery) आहे.

Nagpur News: नागपुरातील एका डॉक्टरानं 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या हृदयाची झडप शस्त्रक्रिया न करताच बदलली (changed heart valve without any surgery) आहे.

    नागपूर, 15 नोव्हेंबर: नागपुरातील (Nagpur) एका डॉक्टरानं 70 वर्षीय वृद्ध महिलेच्या हृदयाची झडप शस्त्रक्रिया न करताच बदलली आहे. संबंधित वयोवृद्ध महिलेवर 19 वर्षांपूर्वी 'ओपन हार्ट सर्जरी' (Open heart surgery)करण्यात आली होती. त्यामुळे आता हृदयाची झडप बदलण्यासाठी पुन्हा शस्त्रक्रिया करणं जोखमीचं काम होतं. पण नागपुरातील डॉक्टरनं शस्त्रक्रिया न करताच हृदयाची झडप बदलली (changed heart valve without any surgery) आहे. त्यामुळे संबंधित महिलेला दुसऱ्यांदा जीवदान मिळालं आहे. नागपूर शहरातील रहिवासी असणाऱ्या 70 वर्षीय महिलेला चार महिन्यांपासून दम लागत होता. तसेच त्यांच्या पायावर सुज आली होती. बऱ्याच दिवस वेदना सहन केल्यानंतर, अखेर त्या नागपुरातील स्वास्थ्यम रुग्णालयात दाखल झाल्या. याठिकाणी इंटरव्हेंशनल कार्डियोलॉजिस्ट (interventional cardiologist) डॉक्टर पंकज हरकूट (Dr. Pankaj Harkut) यांनी संबंधित महिलेला तपासलं. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या हृदयाची झडप बंद असल्याचं निदान झालं. हेही वाचा-VIDEO: एका क्षणात होत्याचं झालं नव्हतं; बिबट्यानं चिमुकल्याची केली भयावह अवस्था त्यांच्या हृदयाच्या शुद्ध रक्तवाहिनीची झडप बंद झाल्यामुळे शरीरात रक्तप्रवास होण्यास अडथळे येत होते. त्यामुळे त्यांनी हृदयाची झडप बदलण्याचा सल्ला दिला. रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईकही झडप बदलण्यासाठी तयार झाले. पण 19 वर्षांपूर्वी त्यांची ओपन हार्ट सर्जरी झाल्यामुळे पुन्हा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करणं जोखीमेचं होतं. असं केल्याने त्यांच्या जीवाला देखील धोका होता. त्यामुळे त्यांनी 'ट्रान्सकॅथेटर अॅओटिंग वॉल्व्ह रिप्लेसमेंट' (transcatheter aortic valve replacement) प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हृदयाची शस्त्रक्रिया न करता हृदयाचा वॉल्व्ह यशस्वीपणे बदलला आहे. हेही वाचा-लग्नासाठी कपलनं कुटुंबासह पोलिसांना आणलं नाकीनऊ; 10 तास पाण्याच्या टाकीवर ठिय्या डॉक्टरांनी वृद्ध महिलेच्या जीवाला कोणताही धोका निर्माण न करता ही अनोखी उपचार पद्धती अवलंबली आहे. याबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर पंकज हरकूट यांनी सांगितलं की, ज्यांना ओपन हार्ट सर्जरीमुळे जोखीम आहे, त्यांच्यासाठी 'ट्रान्सकॅथेटर वॉल्व्ह रिप्लेसमेंट' ही प्रभावी उपचार पद्धती आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता चिरफाड न करता हृदयाची झडप बदलणं शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Nagpur

    पुढील बातम्या