मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

VIDEO : 'काका, मम्मी-पप्पांना मारु नका', चिमुकल्यांची याचना; नर्दयी चुलत्याने गोळ्या झाडल्या

VIDEO : 'काका, मम्मी-पप्पांना मारु नका', चिमुकल्यांची याचना; नर्दयी चुलत्याने गोळ्या झाडल्या

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

आरोपी मुलचंदने पार्टीत वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीचा विषय काढत मोहित यांच्याशी वाद घातला. यावेळी दोन्ही भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की दोघांमध्ये धक्काबुक्की आणि नंतर हाणामारी सुरु झाली.

  • Published by:  Chetan Patil
लखनऊ, 15 नोव्हेंबर : सख्खा भाऊ, पक्का वैरी, अशी एक म्हण आहे. याच म्हणीचा प्रत्यय उत्तर प्रदेशच्या (UP) बुलंदशहर (Bulandshahr) जिल्ह्यात बघायला मिळालाय. बुलंदशहरात एका तरुणाने आपल्या मोठा भाऊ आणि त्याच्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातील पीडित दाम्पत्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आरोपीने वाढदिवसाच्या पार्टीत (Birthday Party) आपल्या भाऊ आणि वहिनीवर गोळीबार (Firing) केला. यावेळी त्यांची मुलं आपल्या काकाकडे तसं न करण्यासाठी विणवणी करत होते.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही शनिवारी (13 नोव्हेंबर) बुलंदशहर जिल्ह्यातील खानपूर पोलीस ठाणे (Khanpur Police Station) हद्दीतील खिदरपूर (Khidpur) गावात घडली. मोहित शर्मा (Mohit Sharna) यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरात शनिवारी रात्री पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पार्टीत दारुचं देखील सेवन करण्यात आलं. पार्टीत मोहित शर्मा यांचा लहान भाऊ मुलचंद हा पिस्तूल घेऊन दाखल झाला होता. हेही वाचा : गुजरातमध्ये ATS चा धडाका, तब्बल 600 कोटींचं हेरॉईन जप्त

आरोपीने वहिणीवर गोळ्या झाडल्या

आरोपी मुलचंदने पार्टीत वडिलोपार्जित संपत्तीच्या वाटणीचा विषय काढत मोहित यांच्याशी वाद घातला. यावेळी दोन्ही भावांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. हे भांडण इतकं मोठं झालं की दोघांमध्ये धक्काबुक्की आणि नंतर हाणामारी सुरु झाली. यावेळी आरोपी मुलचंदने आपल्या खिशातून पिस्तूल काढत थेट भावावर गोळीबार सुरु केला. या गोळीबारात मोहित यांच्या हाताला गोळी लागली. यावेळी मोहित यांची पत्नी त्यांना वाचवण्यासाठी पुढे सरसावली. पण निर्दयी मुलचंदने तिच्यावर गोळीबार केला. त्याने मोहित यांची पत्नी पुजावर तीन गोळ्या झाडल्या. यावेळी शर्मा दाम्पत्याचे मुलं आपल्या काकाकडे आई-वडिलांवर गोळी न झाडण्याची विनंती करत होते. पण आरोपीने त्यांना न जुमानता गोळीबार केला. घटनेचा थरार बघा : हेही वाचा : भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

संबंधित घटनेची पोलिसांना माहिती मिळाली तेव्हा ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपी मुलचंदला रंगेहात बेड्या ठोकल्या. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूल देखील जप्त केली. त्याच्याकडे त्या पिस्तूलचा कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्याजवळ ती पिस्तूल नेमकी कशी आली? याचादेखील पोलीस तपास करत आहेत.
First published:

पुढील बातम्या