नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. तिथे एका व्यक्तीने पत्नी व दोन वर्षांच्या मुलाची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. ब्रिजेश (वय 25) असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केलीय. विशेष म्हणजे या दोन्ही हत्या आरोपीने त्याच्या चार वर्षांच्या मुलासमोर केल्या. ‘आज तक’ने याबाबतचं वृत्त दिलंय.
दिल्लीतल्या नेताजी सुभाष प्लेस पोलीस स्टेशन हद्दीतल्या शकूरपूरमध्ये पतीनं पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकूरपूर ई-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या ब्रिजेशला गेल्या काही दिवसांपासून त्याच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.
हे ही वाचा : बल्बसाठी सीसीटीव्ही चेक केले, पण महिलेला 'त्या' अवस्थेत बघून रहिवाशी हादरले; मुंबईतील धक्कादायक घटना
यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद होत होते. अखेर हा वाद इतक्या विकोपाला गेला की, ब्रिजेशनं पत्नी व दोन वर्षांच्या मुलाची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी तेथूनच आरोपी ब्रिजेशला अटक केली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपास सुरू आहे.
आरोपी ब्रिजेश याने हत्या करण्यासाठी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केलाय. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवले. सध्या पोलीस ब्रिजेश याची चौकशी करीत असून यामधून अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. छोटा मुलगा पत्नीला अवैध संबंधातून झाल्याचा संशय ब्रिजेशला होता. त्यामुळेच त्यानं पत्नीसोबत त्या दोन वर्षाच्या मुलाचीही हत्या केली. चार वर्षांचा स्वतःचा असल्यामुळे त्याला त्यानं जिवंत सोडलं, अशीही माहिती पोलीस तपासात समोर आलीय.
या प्रकाराने शकूरपूर परिसर हादरला आहे. या घटनेची जोरदार चर्चा या भागात सुरू आहे. पोलीस घटनेचा तपास करत असून, आरोपी ब्रिजेश आणखी काय धक्कादायक खुलासे करतो, हे लवकरच स्पष्ट होईल.
हे ही वाचा : बापाचं पोटच्या मुलासोबत धक्कादायक कृत आधी गळा चिरला अन् नंतर...; घटनेनं ठाण्यात खळबळ
दरम्यान, नुकताच हरियाणातल्या सोनिपतमधूनही एका महिलेच्या हत्येची खळबळजनक घटना समोर आली. सोनिपतमध्ये एका विवाहित महिलेचा इंजेक्शन दिल्यानं मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या मंडळींवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप करून पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मृत महिलेच्या भावाने पोलिसांना सांगितलं होतं, 'उपचारांच्या बहाण्यानं त्याच्या बहिणीला इंजेक्शन देण्यात आलं व त्यामुळे तिचा मृत्यू झाला.’
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Delhi latest news, Delhi News, Delhi Police, Murder, Murder news