मुंबई, 17 फेब्रुवारी : समाजामध्ये वावरताना काही नियमांचं पालन केलं पाहिजे, असं म्हटलं जातं. यामध्ये आपली वर्तणूक आणि आपली कपडे घालण्याची पद्धत यांचा समावेश होतो. मात्र, काही व्यक्ती आपण कोणत्या ठिकाणी आहोत, याचं भान न ठेवता वर्तणूक करतात. त्यांच्या अशा वर्तणुकीमुळे कधीकधी आजूबाजूच्या लोकांना लाजिरवाणं वाटतं. मुंबईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. एका रेसिडेन्शिअल कॉम्प्लेक्समधील सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तणूक केल्याबद्दल घरमालक आणि त्याच्याकडे आलेल्या महिला पाहुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांताक्रूझ पूर्व येथील वाकोला परिसरातील रमण एसआरए सीएचएस इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. पाचव्या मजल्यावरील घटना रमण एसआरए सीएचएस इमारतीतील रहिवाशांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गेल्या आठवड्यात इमारतीतील पाचव्या मजल्यावरील रहिवाशाकडे आलेली एक महिला पाहुणी इमारतीत कपडे न घालता फिरत होती. पाचव्या मजल्यावर लिफ्टसमोरील विजेचा बल्ब नाहीसा झाल्याचा तपास लावताना हा प्रकार उघडीस आला. सोसायटीतील सदस्यांनी बल्बचा शोध घेण्यासाठी गेल्या आठवड्यातील सीसीटीव्ही फुटेज पाहिलं असता त्यांच्या लक्षात आलं की, गेल्या सोमवारी रात्री 11.30 च्या सुमारास संबंधित रहिवाशाच्या फ्लॅटमधून बाहेर पडताना महिलेनं अंगावर कोणतेही कपडे घातले नव्हते. रहिवाशांचा आरोप आहे की, ही महिला इमारतीच्या कंपाउंडमध्ये विविध ठिकाणी अश्लील कृत्यं करत होती. याबाबत संबंधित रहिवाशाला माहिती होती, तरी त्याने काहीच कार्यवाही केली नाही. “आम्ही इतर मजल्यावरील फुटेज पाहिलं असता ही महिला इमारतीत कपडे न घालता फिरताना आणि अनेक ठिकाणी अश्लील कृत्ये करताना आढळली. सकाळी 7.30 वाजेपर्यंत ती अशीच वर्तणूक करत होती,” असं पोलीस तक्रारीत रहिवाशांनी म्हटलं आहे. हेही वाचा : बापाचं पोटच्या मुलासोबत धक्कादायक कृत आधी गळा चिरला अन् नंतर…; घटनेनं ठाण्यात खळबळ महिला हे कृत्य करत असताना संबंधित पुरुष रहिवासी आणखी एका पुरुष मित्रासोबत आपल्या फ्लॅटमध्ये होता. त्याला ही महिला काय करत आहे, याची कल्पना होती असा आरोप करण्यात आला आहे. शिवाय, अनेक वर्षांपासून तो अनेक अनोळखी महिलांना त्याच्या फ्लॅटमध्ये आणत आहे. “त्याला असं न करण्यास या पूर्वी अनेकदा सांगितलं आहे. तो त्याच्या कुटुंबासह दुसऱ्या इमारतीत राहतो. मात्र, या इमारतीतील फ्लॅटमध्ये अज्ञात महिलांसोबत येत असतो. या पूर्वीदेखील तो त्याच्या काही महिला मैत्रिणींसोबत असभ्य कृत्य करताना आढळला होता. ज्यामुळे त्याचं आणि इमारतीतील इतर रहिवाशांचं भांडण झालं होतं,” अस तक्रारीत सांगण्यात आलं आहे. हेही वाचा : औरंगाबादेत पुन्हा पोलिसाचा राडा, दारूच्या नशेत महिलांना शिवीगाळ; कारवाईच्या मागणीसाठी मध्यरात्री ठिय्या गुन्हा दाखल पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्यानं रहिवाशांकडून तक्रार मिळाली असल्याचं म्हटलं आहे. अधिकारी म्हणाला, “आम्ही फ्लॅटचा मालक आणि त्या महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम 294 (सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्यं करणं) आणि 114 (प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.