ठाणे, 17, फेब्रुवारी : अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बापानेच आपल्या 12 वर्षांच्या मुलाची हत्या केली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील स्वामीनगर येथील ही घटना आहे. मुलाची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकण्याच्या प्रयत्नात असतानाच आरोपीला स्थानिकांनी पाहिले. त्याचा पाठलाग करून त्याला पकडे आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आनंदकुमार गणेश असं या आरोपीचं नाव आहे. तो या परिसरात गटार आणि चेंबर साफ करण्याचं काम करतो. त्याला दारूचं व्यसन होतं. तसेच मुलगा आणि पत्नी त्याच्यापासून वेगळं राहत होते याच रागातून त्याने मुलाची हत्या केल्याचं समोर आलं आहे. गळा चिरून हत्या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी आनंदकुमार गणेश हा अंबरनाथमधील स्वामीनगर परिसरात राहातो. तो तिथे गटार आणि चेंबर साफ करण्याचं काम करतो. मात्र त्याला दारूचं व्यसन असल्यामुळे त्याचं कुटुंब पत्नी, मुलगा आणि मुलगी त्याच्यापासून वेगळं राहातात. मुलगा आकाश हा रेल्वे स्थानकाबाहेर भाजी विक्री करून कुटुंबाला हातभार लावत होता. बुधवारी रात्री डीएमसी कंपनी परिसरात आरोपीने आपल्याच मुलाची गळा चिरून हत्या केली. तसेच मुलाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तो मृतदेहाला नाल्यात फेकून देणार होता. मात्र ही घटना स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आल्यानं त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधिन केले. हेही वाचा : औरंगाबादेत पुन्हा पोलिसाचा राडा, दारूच्या नशेत महिलांना शिवीगाळ; कारवाईच्या मागणीसाठी मध्यरात्री ठिय्या दारूचं व्यसन आनंदकुमार याला दारूचं व्यसन होतं. त्याला दारूसाठी सतत पैसे लागत होते. तो वारंवार कुटुंबाकडे पैशांची मागणी करत असे. त्याच्या या त्रालासा कंटाळून त्याची पत्नी आपला मुलगा आकाश आणि मुलीसोबत स्वतंत्र राहत होती. भाजीविक्री करून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करत होते. मात्र मुलगा आणि पत्नी आपल्यापासून दूर राहातात याचा राग आरोपीला होता आणि याच रागाच्या भरात त्यांने आपला मुलगा आकाश याची गळा चिरून हत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.