नवी दिल्ली 03 जानेवारी : देशाची राजधानी नवी दिल्लीमध्ये दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. पण, या घटनेच्या वेळीत मृत तरुणीसोबत तिची मैत्रिण सुद्धा असल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत दारूच्या नशेत एका टोळक्याने बलोनो कारने तरुणीच्य स्कुटीला धडक दिली. धडक दिल्यानंतर तरुणीला 10 किमी फरफटत नेलं.10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. या प्रकरणाला आता नवीन वळण मिळालं आहे.
ज्यावेळी मृत तरुणी अंजलीचा अपघात झाला त्यावेळी तिच्यासोबत आणखी एक तरुणी होती. एक सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. मृत तरुणी आणि तिची मैत्रिण सोबतच जर ती या तरुणीसोबत होती आणि तिला इजा झाली असेल तर तिने याबद्दल पोलिसांना का सांगितले नाही, असा सवाल निर्माण झाला आहे. (10 किमी फरफटत नेल्यानं महिलेची सगळी हाडं तुटली, तरी..; दिल्ली अपघाताचा थरकाप उडवणारा CCTV VIDEO) काय आहे प्रकरण? नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीमध्ये संतापजनक घटना घडली. दारूच्या नशेत पाच तरुणांनी बलोनो कारमधून तरुणीला 10 किमी फरफटत नेल्याचंस समोर आलं. 10 किमी फरफटत नेल्यामुळे पीडित मुलीची सगळी हाडं तुटली आणि तिचा मृत्यू झाला. पीडित मुलीच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दिल्ली पोलिसांनी पाचही आरोपी युवकांना अटक केली आहे. यातील एक क्रेडिट कार्ड कलेक्शनचं काम करतो. मृत तरुणी पार्ट टाईम जॉब करत होती. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाने (DCW) पोलिसांना नोटीसही बजावली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजवाला पोलीस स्टेशन (रोहिणी जिल्हा) येथे पहाटे 3 वाजून 24 मिनिटांनी कुतुबगढ भागाकडे जाणाऱ्या कारला एक मृतदेह बांधलेला असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सांगितलं की, मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मंगोलपुरी येथील संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. (तरुणी प्रेमात झाली आंधळी, बॉयफ्रेंडसाठी स्वत:च्या आईसोबत केलं भयानक कांड) पोलिस उपायुक्त हरेंद्र कुमार सिंग यांनी सांगितलं की, पीडितेचा पाय कारच्या एका चाकात अडकला आणि तिला गाडीसोबतच फरफटत नेण्यात आलं. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 279 (रॅश ड्रायव्हिंग) आणि 304-A (निष्काळजीपणामुळे मृत्यू) या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक खन्ना (26), अमित खन्ना (25), कृष्णा (27), मिथुन (26) आणि मनोज मित्तल यांना अटक करण्यात आली आहे.