• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • गूढ! पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप

गूढ! पत्नीचा जळालेला मृतदेह पाहून पतीला धक्का, माहेरच्यांनी केला खुनाचा आरोप

छतावर आपल्या पत्नीचा (Dead body of a woman found on the roof of the house) जळालेला मृतदेह पाहून पतीला जबर धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. कामावरून घरी परत आलेल्या पतीला पत्नी घरात दिसली नाही.

 • Share this:
  शिमला, 21 नोव्हेंबर: छतावर आपल्या पत्नीचा (Dead body of a woman found on the roof of the house) जळालेला मृतदेह पाहून पतीला जबर धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. कामावरून घरी परत आलेल्या पतीला पत्नी घरात दिसली नाही. त्यामुळे ती (Husband found dead body on roof) कामावरून परत आली नसावी, असं त्याला वाटलं. काही वेळाने मात्र छतावर पत्नीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह त्याला सापडला आणि जबर धक्का बसला. या मृत्यूचे गूढ कायम (Mystery unresolved) असून पोलीस याचा तपास करत आहेत. अशी घडली घटना हिमाचल प्रदेशच्या उनामध्ये राहणारे अमरजित सिंह हे एका खासगी कंपनीत काम करतात. त्याचा विवाह मीनाक्षी नावाच्या तरुणीसोबत 15 वर्षांपूर्वी झाला होता. त्यांना 14 वर्षांची एक मुलगीदेखील आहे. मीनाक्षी या शिक्षिका होत्या. रोजच्याप्रमाणं अमरजित हे रात्री कामावरून घरी आले असता, घरात कुणीच नव्हतं. नात्यातील एक लग्न असल्यामुळे घरातील सर्वजण कार्यालयात गेले होते. आपली पत्नी शाळेच्या कामात व्यस्त असेल, असं वाटल्यामुळे त्यांनी स्वतःच स्वयंपाक करून जेवण केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलीला फोन लावला. फोनवर बोलताना आई घरातच असल्याचं मुलीनं सांगितलं. छतावर सापडला मृतदेह मुलीच्या फोननंतर अमरजित यांनी घरातील सर्व खोल्या तपासल्या. शेवटी ते छतावर गेले असता तिथं जळालेल्या अवस्थेतील पत्नीचा मृतदेह पाहून त्यांना धक्का बसला. आपल्या पत्नीने आत्महत्या केल्याची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. खुनाचा आरोप मीनाक्षीची आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी प्रत्यक्षात तिचा खून करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानं केला आहे. यापूर्वीदेखील सासरच्या मंडळींसोबत मीनाक्षीची दोन वेळा कडाक्याची भांडणं झाली होती. दोन्ही वेळा मीनाक्षीच्या वडिलांनी मध्यस्थी करून प्रकरण थंड केलं होतं. मात्र ही केवळ घरगुती भांडणं असून ती लवकरच मिटतील, अशी आपली अपेक्षा होती. त्यातून आपल्या बहिणीचा खून होईल, असं कधीही वाटलं नव्हतं, अशी प्रतिक्रिया तिच्या भावाने दिली आहे. हे वाचा- गुप्त रोगाचा आला संशय, पत्नीनं असा वाजवला पतीचा गेम पोलीस तपास सुरू पोलिसांना या प्रकरणात सुसाईट नोट सापडलेली नाही. या प्रकरणी अधिक पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न सुरु असून पोलीस तपास करत आहेत.
  Published by:desk news
  First published: