मराठी बातम्या /बातम्या /देश /

पत्नीला पतीवर आला गुप्त रोगाचा संशय, कोल्ड्रिंक्समध्ये विष देऊन केला खून

पत्नीला पतीवर आला गुप्त रोगाचा संशय, कोल्ड्रिंक्समध्ये विष देऊन केला खून

धनबादमध्ये (Dhanbad) एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

धनबादमध्ये (Dhanbad) एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

धनबादमध्ये (Dhanbad) एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

झारखंड, 21 नोव्हेंबर: झारखंडमधील कोळसा शहर धनबादमध्ये (Dhanbad) एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ही घटना जिल्ह्यातील महुदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. मृत अजयच्या नातेवाईकांनी त्यांच्या सुनेवर खुनाचा आरोप केला आहे. अजयची पत्नी तन्नू कुमारीने कोल्ड्रिंक्समध्ये (Cold Drinks) विष टाकून हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

16 नोव्हेंबर रोजी अजयला त्याच्या पत्नीनं घरी कोल्ड ड्रिंक पाजलं होतं, त्यानंतर अजयची तब्येत बिघडली. तो जमिनीवर बेशुद्ध पडला, त्याला घरातल्यांनी उपचारासाठी बोकारो BGH मध्ये दाखल केलं. जेथे त्याची प्रकृती आणखीन गंभीर झाली. त्यामुले त्याला रांची मेडिका रुग्णालयात नेण्यात आले. रांचीच्या मेडिका रुग्णालयात उपचारादरम्यान अजयचा मृत्यू झाला.

पत्नीला होता संशय

मृत अजयच्या नातेवाईकांनी महुदा पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून त्याची पत्नी, सासू, सासरे यांना अटक करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी सांगितलं की, पती-पत्नीमध्ये रोज भांडणं व्हायची. पत्नीला पती अजयला गुप्त आजार असल्याचा संशय आला होता. तर पती अजयनं पत्नीवर दुसऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावरुन दोघांमध्ये दररोज वाद व्हायचे.

हेही वाचा- पावसाचं थैमान, मुसळधार पावसाचे 28 बळी; 15 हजारांहून अधिक बेघर

मृत्यूपूर्वी अजय दासने बोकारो येथील बीजीएच रुग्णालयात सेक्टर-4 पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यासमोर दिलेल्या जबाबात सांगितले आहे की, मिहिर दास यांची मुलगी तन्नू कुमारी हिच्याशी दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तन्नू कुमारी ही अमलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलगढिया येथील सिरफोर बस्ती येथील रहिवासी आहे. मात्र लग्नानंतर पत्नीनं त्याच्यासोबत राहायचं नसल्याचं सांगितलं आणि त्याचे कुटुंब उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली.

मृत अजयच्या भावानं सांगितलं की, वहिनीनं कोल्ड्रिंक्समध्ये विष देऊन भावाची हत्या केली. मृत अजयच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या सुनेचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध आहेत. रात्री उशिरापर्यंत ती कोणाशी तरी लपून बोलायची.

हेही वाचा- IPL 2022: भारतीय फॅन्ससाठी Good News, पुढच्या सिझनबाबत BCCI नं केली मोठी घोषणा 

अजय ओरडल्यानंतरही संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू, अशी धमकी ती द्यायची. सून आणि तिच्या आई-वडिलांनी माझ्या मुलाच्या कोल्ड्रिंक्समध्ये विष टाकून हत्या केली आहे. पीडितेच्या कुटुंबीयांनी आता प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.

First published:

Tags: Crime news, Jharkhand