भिवंडी, 08 जानेवारी : भिवंडी (Bhiwandi) शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत एका 7 वर्षीय चिमुकल्याचा सांगाडा आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा चिमुरडा नोव्हेंबर महिन्यापासून बेपत्ता होता.
फारुकी अब्दुल अहद तंजुद्दीन (वय 7) असं मृतदेह सापडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. फारूकी हा 24 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाला होता. त्याचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही. त्यामुळे त्याच्या पालकांनी 25 नोव्हेंबर रोजी भोईवाडा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याचा शोध सुरू असताना गुरुवारी रात्री समरूबाग परिसरातील इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला.
शिवसेनेकडून आज राजकीय भूकंप, भाजपचे 2 मोठे नेते शिवबंधन बांधणार?
त्याचा सांगाडा अवस्थेत मृतदेह आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटना स्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी केली. हा मृतदेह बेपत्ता असलेल्या सात वर्षीय फारुकीचा असल्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर गांगुली या 'खास व्यक्ती'ला म्हणाला धन्यवाद
बंद असलेल्या या इमारतीच्या बेसमेंट पाण्याच्या टाकीला झाकणच नसल्याचे समोर आले आहे. नक्की त्याचा मृतदेह टाकीत कसा आला याचा तपास पोलीस घेत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.