भारतीय टीमचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला गुरूवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यामुळे गांगुलीला कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयात गांगुलीवर एन्जियोप्लास्टी करण्यात आली आणि आता 2-3 आठवड्यानंतर त्याची पुन्हा डॉक्टर तपासणी करणार आहेत.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सौरव गांगुलीने त्याचा लहानपणीचा मित्र जॉयदीपचे आभार मानले आहेत. गांगुलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली. कठीण दिवसांमध्ये जॉयदीपने केलेली मदत कधीही विसरणार नाही, असं गांगुली म्हणाला आहे. 'तू जे मागच्या 5 दिवसात माझ्यासाठी केलंस ते मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. मी तुला मागची 40 वर्ष ओळखतो. आता हे नातं कुटुंबापेक्षाही पुढे आहे,' असं गांगुली म्हणाला.