जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बापच राक्षस बनला! कुत्र्याचा राग लेकीवर काढत केला गोळीबार, उस्मानाबादला हादरवणारी घटना

बापच राक्षस बनला! कुत्र्याचा राग लेकीवर काढत केला गोळीबार, उस्मानाबादला हादरवणारी घटना

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

या घटनेत कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून एका पित्याने आपल्या मुलीवर गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. तुळजापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. काजल शिंदे असं मृत मुलीचं नाव आहे. (Father Killed Daughter)

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

उस्मानाबाद 20 सप्टेंबर : आई-वडील आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असतात. आपल्या मुलाला काही त्रास सहन करावा लागू नये किंवा त्यांना प्रत्येक संकटातून बाहेर काढण्यासाठी आई-वडील अगदी स्वतःचा जीव द्यायलाही तयार असतात. मात्र, काहीवेळा हेच आई-वडील मुलांच्या जीवावर उठल्याच्या धक्कादायक घटनाही समोर येतात. अशीच एक हादरवणारी घटवा उस्मानाबादमधून समोर आली आहे. कुत्रा भुंकत असल्याने भडकला व्यक्ती; रागात पाठलाग करत क्रूरतेचा कळस गाठला या घटनेत कुत्र्याने मटण खाल्लं म्हणून एका पित्याने आपल्या मुलीवर गावठी रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. तुळजापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. किरकोळ कारणावरुन या पित्याने गोळी झाडून आपल्या मुलीचा जीव घेतला आहे. काजल शिंदे असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील गणेश झंपण भोसले आणि मिराबाई गणेश भोसले या दोघा पती- पत्नींनी रविवारी त्यांची मुलगी काजल मनोज शिंदे (वय 22) हिला कुत्र्याने मटण खाल्याच्या कारणावरुन शिवीगाळ केली. ते इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर गणेश भोसले यांनी त्यांच्याजवळील गावठी रिव्हॉल्व्हरमधून काजलवर गोळी झाडली. यामध्ये काजल गंभीर जखमी झाली. पनवेल : अनैतिक संबंधात अडसर, प्रेयसीने दिली प्रियकराच्या इंजिनिअर पत्नीची सुपारी हा प्रकार समजताच काजलचे नातेवाईक विशाल जयराम भोसले यांनी तिला तुळजापुर उपजिल्हा रुग्णालय दाखल केलं. प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी तिला उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं जात होतं, मात्र वाटेतच काजलचा मृत्यू झाला. गणेश भोसले आणि मिराबाई भोसले या दोघांनी मनोज सुनिल शिंदे यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. मनोज सुनिल शिंदे यांनी दिलेल्या तक्ररीवरुन गुन्हा नोंदवला गेला आहे. सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात