मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पनवेल : अनैतिक संबंधात अडसर, प्रेयसीने दिली प्रियकराच्या इंजिनिअर पत्नीची सुपारी

पनवेल : अनैतिक संबंधात अडसर, प्रेयसीने दिली प्रियकराच्या इंजिनिअर पत्नीची सुपारी

मृत महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

मृत महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

मृत महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  News18 Desk

बुलढाणा, 19 सप्टेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. आता बुलढाणा जिल्ह्यातूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रेयसीसह पतीनेच सुपारी देऊन त्याच्या पत्नीची हत्या घडवून आणली. प्रियंका देवव्रतसिंग रावत (29) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

15 सप्टेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास विवाहितेवर धारदार शस्त्राने हल्ला करत तिची हत्या करण्यात आली. ही घटना नवी मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पनवेल पूर्व रेल्वेस्थानकाजवळ घडली होती. या प्रकरणात मलकापूरच्या गोपनीय शाखेसह मुंबई पोलिसांच्या पथकाने मलकापुरातील तिघांना रविवारी रात्री अटक केली. या हत्येसाठी प्रेयसीने तिन्ही आरोपींना 3 लाख रुपयांची सुपारी दिली होती. रोहित राजू सोनुने (22 रा. शिवाजीनगर, मलकापूर), दीपक दिनकर चोखंडे (25, रा.बेलाड ता. मलकापूर) आणि त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (26, जौनपूर, उत्तरप्रदेश) अशी तिन्ही अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींना अटक करुन मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मृत महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याला प्रेयसीसोबत रहायचे होते. मात्र, त्याची पत्नी प्रियंका या अनैतिक संबंधात अडसर ठरत होती. त्यामुळे थेट प्रेयसीनेच प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्याची तयारी केली. त्यासाठी तिने मलकापूरच्या रोहित राजू सोनोने याला संपर्क साधला. यानंतर तो आपल्या साथीदारांना घेऊन मुंबईत पोहचला असता प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी या तिघांना 3 लाखांची सुपारी दिली.

त्यातील 2 लाख रुपये आधी उर्वरित हत्या केल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यामुळे आरोपींनी विवाहितेवर पाळत ठेवली. ती कामावरुन परतत असताना 15 सप्टेंबरला नवी पनवेल पूर्व रेल्वे स्थानकातील सिडको पार्किंगलगच्या एटीएमजवळ रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास तिची हत्या केली.

दरम्यान, या घटनेनंतर याप्रकरणी मृत महिलेच्या सासऱ्याने 16 सप्टेंबरला पहाटे 3 वाजताच्या सुमारास खांदेश्वर पोलिसात तक्रार दिल्यावर त्यावेळी अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. राजेंद्र कुंदनसिंग रावत (विहिघर, ता. पनवेल) यांनी त्यांची मोठी सून प्रियंका देवव्रतसिंग रावत (29) हिचा रात्री 9 ते 10 वाजताच्या दरम्यान खून झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. प्रियंका ही सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. तसेच ठाण्यातील एका कंपनीत ती डिजिटल मार्केटिंगचे काम करत होती. तर तिचा पती हा ॲमेझॉन कंपनीत कार्यरत होता.

हेही वाचा - कायद्याचंबोला! ब्रेकअपनंतर सोशल मीडियावर सारखा पाहायचा तरुणीचे स्टेटस, 5 वर्षांचा कारावास अन्..

याप्रकरणी पोलिसांनी तपास करत मृत विवाहितेचा पती देवव्रतसिंग याला प्रेयसीसह अटक केली आहे. त्यांनी हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांचे पथक रविवारी सकाळी मलकापुरात दाखल झाले. मलकापूर पोलिसांच्या डीबी पथकाच्या मदतीने दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बेलाड येथे सिनेस्टाईल पाठलाग करून तिघा आरोपींना पकडण्यात आले आहे.

First published:

Tags: Buldhana news, Panvel, Women extramarital affair