Home /News /pune /

29 टन डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा VIDEO

29 टन डांबर घेऊन जाणाऱ्या टँकरला ओव्हरटेक, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचा VIDEO

किवळे एक्झिट इथं पोहोचला असता अचानक एका भरधाव वाहनाने ओव्हरटेक केल्याने टँकरवरील चालकाचा ताबा सुटला.

    आनिस शेख, प्रतिनिधी पुणे, 15 जुलै : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर  किवळे एक्झिट येथे मुंबईहून पुण्याकडे डांबराची वाहतूक करणारा टँकर उलटला. त्यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डांबर पसरले असल्याने इतर वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. मुंबई येथून सांगली येथील प्लांटवर 29 टन डांबराची वाहतूक करणाऱ्या टँकर रवाना झाला होता. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर 94 किलोमीटरवर किवळे एक्झिट इथं पोहोचला असता अचानक एका भरधाव वाहनाने ओव्हरटेक केल्याने टँकरवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव वेगात असलेला टँकर उलटला. हा अपघात सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून क्लीनरला उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील किवळे एक्झिटजवळ असणाऱ्या तीव्र उतारामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मागील आठ दिवसांपूर्वी भरधाव कंटेनर ट्रक अशाच प्रकारे तीव्र उतारावरील लोखंडी रेलिंग तोडून वीस फूट खाली जाऊन उलटला होता. मारुती सुझुकी कारला भीषण अपघात 13 जुलै रोजीच मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या भरधाव चारचाकी कारला भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील तिघे जण गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी झाले होते. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा पार चुराडा झाला. भरधाव वेगात असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले आणि कार एक्स्प्रेस वेवर सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या लोखंडी रेलिंग तोडून उलटली. या कारचा वेग इतका होता की, महामार्गावर लावण्यात आलेल्या रेलिंग अक्षरश: तोडून दूर फेकले गेले. या अपघातात सुदीप घोश, शुभम फुंडे ,अनुराग मिश्रा, हे तिघे गंभीर जखमी झाले असून प्रसाद पाटील किरकोळ जखमी झाला आहे. हे सर्वजण उल्हासनगर मुंबई येथून मारुती सुझुकी सियाझ या कारने पुण्याकडे जात होते. एक्स्प्रेस वेवरील गहुंजे स्टेडियमजवळ हा अपघात झाला होता.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Tanker accident, अपघात

    पुढील बातम्या