जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / VIDEO : सोसायटीत सुमडीत शिरला, सायकल घेवून पळाला, खारघरमध्ये चोरटा सीसीटीव्हीत कैद

VIDEO : सोसायटीत सुमडीत शिरला, सायकल घेवून पळाला, खारघरमध्ये चोरटा सीसीटीव्हीत कैद

खारघरमध्ये सायकल चोरांचा सुळसुळाट

खारघरमध्ये सायकल चोरांचा सुळसुळाट

खारघरमध्ये एक चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो अतिशय चालाखीने सोसायटीत शिरतो. सोसायटीत शांतता असल्याचा फायदा घेवून तो सायकल चोरुन नेतो. त्याचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

प्रमोद पाटील, नवी मुंबई, 1 सप्टेंबर : चोर चोरी करण्यासाठी कसा येतो? हे आपल्याला अनेकदा कळत नाही. हे चोरटे रेकी करतात आणि संधी मिळताच चोरी करुन पळून जातात. या चोरांना पकडणं अनेकदा आपल्याला शक्य होत नाही. पण हल्ली सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरांची चोरी पकडली जातेय. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे या चोरांपर्यंत पोहोचणं शक्य झालं आहे. खारघरमध्ये असाच एक चोरटा कॅमेऱ्यात कैद झाला आहे. तो अतिशय चालाखीने सोसायटीत शिरतो. सोसायटीत शांतता असल्याचा फायदा घेवून तो सायकल चोरुन नेतो. त्याचा हा सर्व प्रताप कॅमेऱ्यात अचूकपणे कैद झाला आहे. खारघर परिसरात सायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. सायकल चोर सोसायटीत वॉचमन नसल्याचा फायदा घेऊन सोसायटीच्या आवारात प्रवेश करतो आणि काही काळ थांबून तेथील सायकल हेरतो. त्यानंतर सायकलवर बसून तेथून पळ काढतो. असाच एक प्रकार खारघर सेक्टर 34, फॉर्च्यून स्प्रिंग या बिल्डिंगमध्ये घडला आहे.

जाहिरात

( वॉचमॅनला ड्यूटीदरम्यान रंगेहाथ पकडलं, आतापर्यंत 4 जणांची हत्या; शहरात दहशत ) सायकल चोरी कताना चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सायकल चोरी करणारा गुन्हेगार हा सराईत गुन्हेगार असून याचे नाव रामबाबू असल्याचे समोर आले आहे. राम बाबू हा सराईत गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी त्याला अटक करण्यात आली होती. मात्र तो पुन्हा जेलमधून बाहेर आला आहे. राम बाबू आजही तशाच प्रकारचे वारंवार गुन्हे करत आहे. याबाबत भानू प्रताप सिंग फॉर्च्यून स्प्रिंग बिल्डिंगचे सेक्रेटरी यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. त्यांनी आरोपीला तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मात्र हा सायकल चोर आरोपी खुलेआम फिरत असल्याचे दिसत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: cctv , crime
  • First Published :
जाहिरात
जाहिरात