भोपाळ, 1 सप्टेंबर : मध्य प्रदेशातील सागरमध्ये एक सीरियल किलर फिरत असल्याचं वृत्त समोर आलं आहे. हा सीरियल किलर वॉचमॅनच्या शोधात असतो. ड्यूटीदरम्यान झोपताना कोणी वॉचमॅन दिसताच तो त्याची हत्या करतो. आतापर्यंत 4 वॉचमॅनची हत्या करण्यात आली आहे. या घटनांचा पॅटर्नच इतका विचित्र आहे, ज्यामुळे पोलिसांना या सर्व घटनांमध्ये सीरियल किलर असल्याचा संशय आहे. वारंवार होत असणाऱ्या या घटनांमुळे शहरात दहशत पसरली आहे.
या घटनांनंतर पोलीस फोर्सला अलर्ट करण्यात आलं आहे. रात्रीच्या वेळी गस्त घालणाऱ्या टीमलाही अलर्ट करण्यात आलं आहे. या प्रकरणातील काही सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासानुसार, सीसीटीव्हीमध्ये एक संशयास्पद व्यक्त पांढरा शर्ट आणि हाफ पँट घातलेला दिसत आहे. पोलिसांनी संशयास्पद व्यक्तीचा स्केचही जारी केला आहे.
‘सौंदर्यवती’ला प्रत्यक्षात पाहून दरदरून फुटला घाम; 2 हजार रुपये देऊन घरी बोलावलेल्या ‘तरुणी’चे केले 2 तुकडेकँट पोलीस ठाणे हद्दीतील एका कारखाण्याच्या वॉचमॅनच्या डोक्यावर हातोडीने हल्ला करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. याशिवाय मोतीनगरजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा वॉचमॅन रात्रीच्या वेळी झोपला होता. यावेळी एका व्यक्तीने फावड्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यानंतर त्याला रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. या सर्व होणाऱ्या घटनांनंतर ती व्यक्ती सीरियल किलर असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 1 मे रोजीही बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या वॉचमॅनचा झोपलेला असताना हत्या करण्यात आली होती.

)







