• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • तरुणीला करायची होती सामूहिक बलात्काराची तक्रार, घाबरलेल्या आरोपींनी केला निर्घृण खून

तरुणीला करायची होती सामूहिक बलात्काराची तक्रार, घाबरलेल्या आरोपींनी केला निर्घृण खून

गँगरेप केलेल्या आरोपींनी शिक्षेच्या भितीनं (Criminals kill gang rape victim as she prepared to file police complaint) पीडित तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

 • Share this:
  रांची, 25 ऑक्टोबर : गँगरेप केलेल्या आरोपींनी शिक्षेच्या भितीनं (Criminals kill gang rape victim as she prepared to file police complaint) पीडित तरुणीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आठ दिवसांपूर्वीच काही (Gang rape and threat) तरुणांनी गावातील तरुणीवर अत्याचार केला होता. वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी गावात राहत होते. मात्र या तरुणीनं अन्यायाला वाचा फोडत पोलिसांत तक्रार करण्याची तयारी केली होती. याची माहिती मिळताच तरुणीला संपवण्याचा कट आरोपींनी आखला आणि तडीस नेला. बलात्कार आणि खून झारखंडमधील दुमकामध्ये बॉबी यादव, अनुराग दास आणि भूकंप हादसा हे तीन मित्र राहतात. गुडं प्रवृत्तीच्या या तरुणांनी गावातच राहणाऱ्या एका तरुणीवर बलात्कार करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. गावात कुणाकडे वाच्यता केली किंवा पोलिसांत जाण्याचा विचार केला, तर खून करण्याची तंबी देणारे हे आरोपी प्रचंड घाबरलेले होते. तरुणीनं तिच्यावर झालेल्या अत्याचारातून सावरत या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय घेतला होता. तरुणीने केली तयारी आपल्यासोबत झालेल्या प्रकारानंतर धक्क बसलेली तरुणी काही दिवसांनी सावरली आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचा निर्णय तिने घेतला. त्यासाठी कुटुंबीयांच्या मदतीनं पोलिसांत तक्रार करण्याची तयारी तरुणीनं केली होती. मात्र ही तरूणी पोलिसांत तक्रार करणार असल्याची कुणकुण आरोपी तरुणांना लागली. आपल्यावर होणाऱ्या संभाव्य कारवाईच्या भितीने घाबरलेल्या आरोपींनी तरुणीलाच संपवण्याचा कट रचला. तीन आरोपींनी त्यांच्या इतर मित्रांना कटात सहभागी करून घेतलं आणि सर्वांनी मिळून तरुणीचा खून केला. हे वाचा- स्वतःला पेटवून रिक्षाचालक घुसला पोलीस ठाण्यात, कारण ऐकून सामान्यांना बसला धक्का पोलीस तपास सुरू पोलिसांना निर्जन स्थळी तरुणीचा मृतदेह सापडल्यानंतर तपासाची चक्रं फिरली आणि सत्य समोर आलं. पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली असून इतर आरोपी फरार आहेत. लवकरच त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.
  Published by:desk news
  First published: