• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • स्वतःला पेटवून रिक्षाचालक घुसला पोलीस ठाण्यात, कारण ऐकून सामान्यांना बसला धक्का

स्वतःला पेटवून रिक्षाचालक घुसला पोलीस ठाण्यात, कारण ऐकून सामान्यांना बसला धक्का

एक रिक्षाचालक स्वतःला पेटवून घेत (An auto driver burned himself to seek police attention) थेट पोलीस ठाण्यात घुसल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

 • Share this:
  भोपाळ, 25 ऑक्टोबर : एक रिक्षाचालक स्वतःला पेटवून घेत (An auto driver burned himself to seek police attention) थेट पोलीस ठाण्यात घुसल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आपल्या तक्रारीकडे लक्ष देत नाहीत, असं सांगत त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठीच आपण हे कृत्य केल्याचं त्यानं म्हटलं आहे. या घटनेचा (Video goes viral) व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत असून रिक्षाचालक या घटनेत चांगलाच भाजला आहे. अशी घडली घटना मध्यप्रदेशच्या अनुपपूरमध्ये राहणाऱरे 50 वर्षीय मुरारी लाल शिवहरे हे रिक्षा चालवण्याचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा रिक्षातील तीन ग्राहकांशी वाद झाला होता. या वादानंतर ग्राहकांनी आपल्या खिशातील पैसे चोरून आपल्याला लुबाडल्याची तक्रार शिवहरे यांनी पोलीस ठाण्यात केली होती. मात्र आपल्या तक्रारीची कुठलीही दखल घेण्यात आली नाही, असा त्यांचा दावा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तक्रार नोंदवल्याबद्दल मुरारी लाल यांच्या मुलाला मारहाण करण्यात आली. मुलाला घेऊन ते पुन्हा पोलीस ठाण्यात गेले. तेव्हा मारहाणीची तक्रारही पोलिसांनी नोंदवून  घेतली. पोलीस तक्रार नोंदवूनही काही कारवाई करत नसल्यामुळे आरोपींचं धाडस अधिकच वाढत असल्याचं मत मुरारी लाल यांनी व्यक्त केलं. लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला पेटवले पोलीस लक्षच देत नसल्यामुळे त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. रिक्षात बसून त्यांनी स्वतःच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य ओतून स्वतःला आग लावली. आग लागल्यानंतर ते धावतच पोलीस ठाण्यात घुसले. पेटती व्यक्ती पोलीस ठाण्यात घुसल्याचं पाहून उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. काही पोलिसांनी मुरारी यांना जमिनीवर आडवं पाडत त्यांच्या अंगावर घोंगडी टाकून आग विझवली. मात्र यात ते 60 टक्के भाजले गेले. हे वाचा- Jio दिवाळीआधी देणार मोठं गिफ्ट; लाँच होणार जगातील सर्वात स्वस्त Smartphone पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण मुरारी यांच्या मुलाला झालेल्या मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी केलेल्या लुटमारीच्या आरोपाचे कुठलेही पुरावे नसल्यामुळे ती कलमं लावण्यात आली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published: