महेंद्र बिष्णोई (नागौर), 30 मार्च : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील कुचेरा पोलीसांनी मोठी कारवाई केली आहे. चोऱ्या करून दहशत माजवणाऱ्या टोळीतील 3 आरोपींना पकडण्यात यश आले आहे. हे चोर कपड्यांवर घाण टाकत अजब पद्धतीने चोरी करायचे यामुळे त्यांनी मोठी दहशत निर्माण केली होती. दरम्यान 21 मार्च रोजी कुचेरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी एक तक्रार देण्यात आली होती.
यावर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुटाटी या गावचा एक शेतकरी कुचेरा येथील एसबीआय बँकेत पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी ते पैसे घेऊन गावाजवळ येत असताना त्यांच्यावर अचानक चिखलफेक झाली. यावेळी त्यांच्या पँट आणि शर्टावर पडलेली घाण झटकण्यासाठी शेतकऱ्याने पैसे बाजुला ठेवले.
जळगावात भीषण अपघात; ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीसह 7 जनावरे ठार
शांसह कापडी पिशवी जवळच्या दुकानाबाहेरील बाकावर ठेवली. त्यावेळी तो शेतकरी पँटची घाण कागदाच्या साह्याने साफ करत होता. याचाच फायदा घेत अवघ्या 30 सेकंदात चोरटे बॅगेसह एक लाख रुपये घेऊन पळून गेले. पळत असताना त्याने बॅगेत ठेवलेली कागदपत्रे फेकून दिली आणि पैसे घेऊन पळ काढला.
या प्रकरणाचा तपास करत असताना, पोलिसांनी ओम पू. अशोक सिसोदिया (वय 26), मोनू (20) सूरजसिंग(वय 34) यांना अटक केली. यातील काहीजण मध्य प्रदेशात राहत असल्याचे माहिती समोर आली आहे.
विवाहिता प्रियकरासोबत पळाली पण.. प्रेमाचा धक्कादायक शेवट, छ. संभाजीनगर हादरले
दरम्यान चोरट्यांनी वापरलेली कारही जप्त केली आहे. याचबरोबर चोरीचे पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न पोलीस करत आहेत. याचबरोबर अन्य साथिदारांचाही शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Rajasthan