मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जळगावात भीषण अपघात; ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीसह 7 जनावरे ठार

जळगावात भीषण अपघात; ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीसह 7 जनावरे ठार

जळगावात रेल्वेचा भीषण अपघात

जळगावात रेल्वेचा भीषण अपघात

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीसह सात जनावरांचा मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

जळगाव, 30 मार्च, नितीन नांदूरकर :  जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या धडकेत एका व्यक्तीसह सात जनावरांचा मृत्यू झाला आहे.  राजेंद्र भीमराव सूर्यवंशी असं रेल्वेच्या धडकेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नावं आहे. चाळीसगाव तालुक्यातील शिदवाडी गावाजवळ ही घटना घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातामध्ये पाच गई, एक म्हैस व  एक वासरू अशी सात जनावारे आणि गुराखी राजेंद्र सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  रेल्वेचा अंदाज न आल्यानं अपघात  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, मेमो ट्रेन धुळ्याहून चाळीसगावकडे निघाली होती. त्याचदरम्यान शिदवाडी येथील राजेंद्र सूर्यवंशी हे गुरे चारून गावाकडे येत होते. मात्र समोरून येणाऱ्या ट्रेनचा त्यांना अंदाज आला नाही. राजेंद्र सूर्यवंशी हे रेल्वे पटरीवर आल्यानंतर समोरून भरधाव ट्रेन आली. या घटनेत राजेंद्र सूर्यवंशी यांच्यासह सात जनावरांचा जागीच मृत्यू झाला. मृत जनावरांमध्ये  पाच गाई, एक म्हैस आणि एका वासराचा समावेश आहे. हा अपघात इतका भषण होता की, अपघातानंतर काही जनावरे लांब फेकली गेली तर काही जनावरे रेल्वेखाली अडकली.

विवाहिता प्रियकरासोबत पळाली पण.. प्रेमाचा धक्कादायक शेवट, छ. संभाजीनगर हादरले

भीषण अपघात  

अपघातानंतर सुमारे एक तास मेमो ट्रेन घटनास्थळी थांबवण्यात आली होती.  रेल्वेखाली अडकलेली जनावरे बाहेर काढल्यानंतर रेल्वे पुन्हा चाळीसगावकडे रवाना करण्यात आली. या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

First published:
top videos