छत्रपती संभाजीनगर, 30 मार्च, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जोडप्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एकनाथनगर भागात रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.
महिनाभरापूर्वी झाला होता विवाह
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक महिन्यापूर्वी विवाह झालेली तरुणी तिच्या प्रियकरासोबत पळाली. ते ठाण्यामधून पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले. मात्र एकत्र राहाता येत नसल्यानं या जोडप्याने अखेर कंटाळून छत्रपती संभाजीनगरात असलेल्या एकनाथनगर परिसरात रेल्वेसमोर उडी घेतली. आधी तरुणाने रेल्वेसमोर उडी घेतली, त्यानंतर तरुणीने देखील उडी घेतली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मध्यरात्री पतीचे पत्नी-मुलीसोबत भयानक कृत्य; दोन मुलं लपून बसल्याने वाचला जीव
तरुणी गंभीर जखमी
या जोडपल्याने ठाण्यातून पलायन केले होते. या घटनेतील तरुणीचा नुकताच एक महिन्यापूर्वी विवाह झाला होता. मात्र ती तिच्या प्रियकरासोबत पळाली. हे जोडपे ठाण्यातून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातून त्यांनी छत्रपती संभाजीनगर गाठले. मात्र त्यानंतर अचानक त्यांनी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाला तर तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जोडप्याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.