वैशाली (बिहार), 8 जून : एकतर्फी प्रेमातून (One Side Love) अनेक धक्कादायक प्रकार समोर आल्याबाबत तुम्ही वाचले असेल. बिहार राज्याच्या वैशाली (Vaishali Bihar) जिल्ह्यातही एकतर्फी प्रेमातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छेडछाडीला कंटाळून एका मुलीने आपले आयुष्य (Girl Student Death) संपवलं आहे. बारावीच्या विद्यार्थिनीचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. अवघ्या महिन्याभरात एकतर्फी प्रेमाची तिसरी घटना घडली आहे.या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैशाली जिल्ह्यातील गोरौलच्या बहादुरपूर गावात ही घटना घडली. ही मुलगी छेडछाडीच्या घटनेला कंटाळली होती. एका युवकाने तिची घरात घुसून हत्या (Youngster Killed Girl) केली, असा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, मुजफ्फरपूर जिल्ह्याच्या कुढनी येथील रहिवासी असलेला अनिल हा या मुलीला त्रास देत होता. याप्रकरणी मुलीच्या भावाने 3 जूनला पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मंगळवारीही ही विद्यार्थिनी कॉम्प्युटर क्लास करून घरी परतत असताना वाटेत आरोपी तरुणाने तिचा छळ केला. यानंतर सकाळी मुलीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुलीच्या मानेवर खुणा आहेत, त्यामुळे मुलीचा मृत्यू गळा दाबून किंवा लटकून झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आरोपी मुलाच्या बहिणीचे घर मुलीच्या गावात आहे, त्यामुळे तो अनेकदा गावात येत असे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही हत्या आहे, की आत्महत्या की ऑनर किलिंग, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
हेही वाचा - वैतागलेल्या गर्लफ्रेंडचं धक्कादायक कृत्य; बॉयफ्रेंडच्या अंगावर 3 वेळा घातली कार, दिला भयानक मृत्यू
एकतर्फी प्रेमातून याआधी दोन मुलींची हत्या
दरम्यान, महिनाभरात जिल्ह्यात तिसऱ्या मुलीची हत्या झाली आहे. याआधी 12 मे रोजी महुआ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिकवणीवरुन परतणाऱ्या विद्यार्थीनीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या एका आठवड्यानंतर, 18 मे रोजी लालगंज पोलीस स्टेशन परिसरात शिकवणीवरुन परतणाऱ्या बी-कॉमच्या दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थिनीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही हत्या एकतर्फी प्रेमातून करण्यात आल्या, असे कारण याप्रकरणी समोर आले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Girl death, Love at first sight