Home /News /maharashtra /

Pune Crime News : माजी सैनिकाचं पत्नी आणि सासूसोबत धक्कादायक कृत्य, आरोपीसह भावालाही...

Pune Crime News : माजी सैनिकाचं पत्नी आणि सासूसोबत धक्कादायक कृत्य, आरोपीसह भावालाही...

दीपक ढवळे हा माजी सैनिक (Ex-Serviceman) आहे. त्याची आणि त्याच्या पत्नीची घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू होते.

    पुणे, 7 जून : पुण्यामध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. (Pune Crime Incidence) जिल्ह्यात दिवसेंदिवस अत्याचार, हत्येच्या (Murder in Pune) घटना घडताना दिसत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये न्यायालय (Shirur Court) परिसरात गोळीबार (Firing) करण्यात आला आहे. काय आहे घटना - शिरुरमध्ये न्यायालय परिसरात एका व्यक्तीने आपली पत्नी आणि सासूवर गोळीबार केला. (Firing on Wife and Mother in Law) गोळीबाराच्या या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सासू गंभीर जखमी झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना कौटुंबिक वादातून घडली आहे. दीपक ढवळे असे गोळीबार केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. घटनास्थळावरुन तो पसार झाला होता. मात्र, पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर त्याच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की, आरोपी दीपक ढवळे हा माजी सैनिक (Ex-Serviceman) आहे. त्याचे आणि त्याच्या पत्नीचे घटस्फोटासाठी न्यायालयात प्रकरण सुरू होते. न्यायालयात पोटगीसाठी दावा करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीसाठी आई आणि मुलगी दोन्ही न्यायालयात आल्या होत्या. यावेळी परिसरात थांबलेल्या असताना माजी सैनिक दीपक ढवळे याने स्वत: जवळच्या परवाना असलेल्या पिस्तुलमधून दोघींवर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर सासू गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोळीबाराच्या या घटनेनंतर आरोपी दीपक ढवळे याने घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र, पोलिसांनी नाकाबंदी केली आणि त्याला अटक केली. तसेच त्याच्या भावालाही अटक करण्यात आली आहे. हेही वाचा - लग्नाचं आमिष देवून अल्पवयीन मुलीसोबत गाठला विकृतीचा कळस; नंतर सोशल मीडियावरही... हत्येचे कारण अस्पष्ट - पत्नी आणि सासूवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मात्र, हा गोळीबार का करण्यात आला, अद्याप याचे कारण अस्पष्ट आहे. तर घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची पुढील तपासासाठी मदत घेतली. पोलीस आरोपी आणि त्याचा भाऊ यांची कसून चौकशी करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Death, Gun firing, Pune, Pune crime news

    पुढील बातम्या