जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / वेबसीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलसोबत संतापजनक कृत्य; मुंबईतील धक्कादायक प्रकार

वेबसीरिजमध्ये काम देण्याच्या बहाण्याने मॉडेलसोबत संतापजनक कृत्य; मुंबईतील धक्कादायक प्रकार

फाईल फोटो

फाईल फोटो

एका मॉडेलची पॉर्न फिल्म बनवत इंटरनेटवर अपलोड करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई 05 डिसेंबर : मुंबई म्हणजे स्वप्नांचं शहर. असंख्य स्वप्न घेऊन लोक या शहरात येत असतात. अनेकांची स्वप्न पूर्ण होतातही. मात्र, अनेकांसोबत अशा घटना घडतात, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसते. अभिनयाची आवड असलेली अनेक मंडळी मुंबईत आपलं नशीब आजमवण्यासाठी येतात. मात्र, अनेकदा चित्रपट, बेवसीरिज, मालिकांमध्ये काम देण्याचं आमिष देत त्यांची फसवणूक केली जाते. अशीच आणखी एक घटना आता समोर आली आहे. यात एका मॉडेलची पॉर्न फिल्म बनवत इंटरनेटवर अपलोड करण्यात आली. या प्रकरणी एका महिलेसह चार जणांवर चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या महिलेला असं सांगण्यात आलं की परदेशी ग्राहकांसाठी असलेल्या वेब-सिरीजसाठी “बोल्ड” सीन करण्याचे आहेत. याच बहाण्याने तिची फसवणूक केली. याबाबत मॉडेलने तक्रार केल्यानंतर ही कारवाई करत एकाला अटक करण्यात आली आहे. 45 वर्षीय महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार, प्रायव्हेट पार्टवर सिगारेटचे चटके, मुंबई हादरली यास्मीन खान, अनिरुद्ध प्रसाद जांगड, अमित पासवान आणि आदित्य अशी आरोपींची नावं आहेत. प्रसाद जांगड हा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. तर, इतर फरार आहेत. तक्रारदार तरुणीनेने विविध ब्रँडचे कपडे आणि कपड्यांसाठी जाहिराती केल्या आहेत. आपल्या आणखी काम मिळावं या उद्देशाने तिने तिचा मोबाईल नंबर, फोटो आणि कामाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. राहुल ठाकूर याने सप्टेंबरमध्ये मॉडेलशी पहिल्यांदा संपर्क साधला आणि तिला केरशॉ नावाच्या व्यक्तीशी बोलण्यास सांगितलं. या व्यक्तीने तिला राहुल पांडेकडे पाठवलं. राहुल पांडे याने या तरुणीला सांगितलं, की त्यांना वेब-सिरीजसाठी “मोबाइल अॅप” नावाच्या ऍप्लिकेशनकरता अभिनेत्रीची गरज आहे. मात्र, यासाठी “बोल्ड सीन्स” करणं आवश्यक आहे. ही सीरिज भारतात प्रसारित होणार असल्याचं समजल्याने या मॉडेलने ऑफर नाकारली. मात्र, नंतर पुन्हा ऑक्टोबरमध्ये पांडे यांनी तिच्याशी संपर्क साधून हा कंटेंट विदेशी अॅपवर प्रसारित करणार असल्याचं सांगितलं आणि तिला या कामासाठी ५० हजार रूपयेही दिले. पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक पुढे मॉडेलला एका फ्लॅटमध्ये नेण्यात आलं. इथे तिला नग्न होण्यास सांगितलं गेलं. तिने याचा विरोध केला असता तिला धमकी देण्यात आली, की १५ लाख रुपयांच्या मानहानीचा खटला भरेल. भीतीपोटी या मॉडेलने शूट पूर्ण केलं असल्याचं तिने पोलिसांना सांगितलं. मात्र, नोव्हेंबर महिन्याच तिच्या ओळखीच्या व्यक्तीने तिला सांगितलं, की तिचा व्हिडिओ पॉर्न साईटवर आहे. तो तिच्या नातेवाईकांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या ग्रुपमध्येही शेअर केला गेला आहे. यानंतर मॉडेलने यास्मीनला कॉल करून हा व्हिडिओ हटवण्यास सांगितलं. मात्र, तिने मॉडेलचे फोन घेणंच बंद केलं. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात