मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक

पालघर हादरले, 21 वर्षीय नराधमाचा 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार; आरोपीला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र

प्रातिनिधिक छायाचित्र

पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India
  • Published by:  Ajay Deshpande

पालघर, 5 डिसेंबर : पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच वर्षीय चिमुकलीवर 21 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली  आहे. चिमुकलीवर अत्याचार करून उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीचं नाव अद्याप समोर आलेलं नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू  असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपीला अटक   

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही चिमुकली आपल्या घराबाहेर खेळत होती. ही संधी साधून 21 वर्षीय  आरोपीने या चिमुकलीला आपल्या घरात बोलावून नेले. त्यानंतर आरोपीने या चिमुकलीवर अत्याचार केला. पालघर जिल्ह्यातील बोईसर पूर्वेमध्ये घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली आहे. दरम्यान हा आरोपी बलात्कारानंतर उत्तर प्रदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र त्यापूर्वीच बोईसर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

First published:

Tags: Palghar