मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी; महिलाही जखमी, घटनेचा Shocking Video

पुण्यात 2 इमारतींच्या रहिवाशांमध्ये तुफान हाणामारी; महिलाही जखमी, घटनेचा Shocking Video

पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी फ्रीस्टाइल हाणामारी झाली (Pune Shocking Video)

  • Published by:  Kiran Pharate
पुणे 20 सप्टेंबर : पुण्यातून नुकतीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथील दोन इमारतींतील रहिवाशांमध्ये लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्यांनी फ्रीस्टाइल हाणामारी झाली. पार्किंगमध्ये ड्रेनेजचं पाणी सोडण्याच्या आणि रस्त्यावरुन ये-जा करण्याच्या वादातून ही हाणामारी झाल्याचं समोर येत आहे. पार्सल घेऊन आलेल्या झोमॅटो बॉयकडून तरुणीचा किस, पुण्यातली खळबळजनक घटना मिळालेल्या माहितीनुसार, या हाणामारीत महिलाही जखमी झाल्या आहेत. दोन्ही बाजूंकडून हवेली पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. मारहाणीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं की दोन इमारतींमधील लोकांमध्ये काहीतरी वाद सुरू आहे. सुरुवातीला शाब्दिक वाद झाल्यानंतर काहीच मिनिटात इथलं वातावरण भयंकर हाणामारीत बदलतं. विशेष म्हणजे या हाणामारीत पुरुषांसह महिलाही पाहायला मिळतात. यातील लोक एकमेकांवर काठीने आणि लोखंडी रॉडने हल्ला करताना दिसतात. यात अनेकांच्या डोक्याला जबर मार लागल्याचंही पाहायला मिळतं. या हाणामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. पुण्यामधून समोर आलेला हा व्हिडिओ अतिशय धक्कादायक आहे. यात काही महिलांसोबत लहान मुलं असल्याचंही पाहायला मिळतं. Kolhapur Crime : कोल्हापुरात बिल देण्यावरून हॉटेल चालकांच्या मुलाला बेदम मारहाण सोमवारी पुण्यातून समोर आलेली धक्कादायक घटना - सोमवारी पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली होती. यात झोमॅटो ॲपच्या डिलिव्हरी बॉयने केलेल्या गैरवर्तनामुळे पुण्यामध्ये खळबळ माजली. जेवणाचे पार्सल घेऊन आलेल्या एका व्यक्तीने 19 वर्षीय तरुणीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. येवलेवाडी परिसरातील एका नामांकित सोसायटीत शनिवारी रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली होती मात्र नंतर जामिनावर त्याची सुटका करण्यात आली .
First published:

Tags: Pune, Shocking video viral

पुढील बातम्या