मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

चार वर्षांपूर्वी आईला संपवलं, नंतर आता लेकीची निर्घृण हत्या; भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

चार वर्षांपूर्वी आईला संपवलं, नंतर आता लेकीची निर्घृण हत्या; भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

भर दिवसा CISF जवानाच्या पत्नीवर गोळीबार

Firing on Woman in Bihar : मृतक महिलेचा भाऊ कुमार भानू यांनी आपले काका आणि महिलेच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दीपिकाच्या सासरच्यांनी आणि काकांनी मिळून तिची हत्या केल्याचा दावा कुमारने केला आहे.

  • Published by:  Chetan Patil
पाटणा, 15 नोव्हेंबर : बिहारच्या मुंगेर (Munger) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात आरोपींनी धनबाद येथे कार्यरत असलेल्या सीआयएसएफ (CISF) जवानाच्या पत्नीवर एकापाठोपाठ तीन गोळ्या झाडून हत्या (Murder) केली आहे. विशेष म्हणजे मृतक विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. आरोपींनी चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये देखील मृतक महिलेवर गोळी झाडली होती. त्यावेळी ती गंभीर जखमी झाली होती. डॉक्टरांनी केलेल्या योग्य उपचारामुळे ती बचावली होती. पण यावेळी आरोपींनी महिलेवर तीन गोळ्या झाडल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

संबंधित घटना ही मुंगेर जिल्ह्यातील कासिम बाजार येथील सामगाछी टोला परिसरात घडली आहे. अज्ञात आरोपींनी आज (15 नोव्हेंबर) सकाळी महिलेची हत्या केली. महिलेचा पती हा धनबाद येथे सीआयएसएफ जवान म्हणून कार्यरत आहे. त्याचं नाव रवी शर्मा असं आहे. तर त्याच्या पत्नीचं म्हणजेच मृत महिलेचं दीपिका शर्मा असं नाव आहे. दीपिका आज सकाळी आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या बाथरुममध्ये जात असताना दबा धरुन बसलेल्या आरोपींनी तिच्यावर गोळी झाडून तिची हत्या केली. हेही वाचा : औरंगाबाद: एकाच दिवशी तरुण-तरुणीनं संपवलं जीवन; गावच्या उपसरपंचावरच गंभीर आरोप

पोलीस घटनास्थळी दाखल

संबंधित घटनेची माहिती उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी अद्याप आरोपींना बेड्या ठोकलेल्या नाहीत. तसेच आरोपींची देखील ओळख पटलेली नाही. पोलिसांना घटनास्थळी दोन बंदूक आणि एक जिवंत काडतूस सापडले आहेत.

मृतक महिलेच्या भावाचे काका आणि सासरच्यांवर गंभीर आरोप

मृतक महिलेचा भाऊ कुमार भानू यांनी आपले काका आणि महिलेच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहेत. दीपिकाच्या सासरच्यांनी आणि काकांनी मिळून तिची हत्या केल्याचा दावा कुमारने केला आहे. कुमार भानूने केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहेत. हेही वाचा : लातूर: एकाच झाडाला गळफास घेऊन अल्पभूधारक शेतकरी जोडप्यानं संपवली जीवनयात्रा

चार वर्षांपूर्वी दीपिकाच्या आईचीदेखील हत्या

दुसरीकडे मृतक दीपिकावर चार वर्षांपूर्वी देखील हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, अशी माहिती तिचा भाऊ कुमार भानूने दिली. त्यावेळी अज्ञात आरोपींनी दीपिका आणि तिची आई गायत्री देवी यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यावेळी दीपिकाला एक गोळी लागली होती. त्यामुळे ती जखमी झाली होती. पण गायत्री देवींचा त्यात मृत्यू झाला होता. या हत्याकांडात दीपिका ही साक्षीदार होती, अशी माहिती देखील कुमारने दिली.
First published:

पुढील बातम्या