नाशिक, 19 जुलै : जिल्ह्यातील कळवणमध्ये पेट्रोल पंपावर दरोडेखोरांनी कोयत्या आणि धारधार शस्त्र घेऊन दरोडा टाकला पण कर्मचारी आणि गावकऱ्यांनी हिंमतीने सामना करून दोघांना पकडले. एखाद्या सिनेमात घडवी अशी थरारक घटना घडली. परंतु, गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत एका दरोडेखोराचा मृत्यू झाला.
घडलेली हकीकत अशी की, नांदुरी तालुका कळवण गावापासून 1 कि.मी. अंतरावर नाशिक रस्त्यावर असलेल्या श्री साई पेट्रोल पंपावर चार दरोडेखोरांनी शनिवारी रात्री 8.30 च्या सुमारास कोयत्याच्या साह्याने हल्ला करत दरोडा टाकला.
गटारीसाठी कायपण, पुण्यात परिस्थितीत गंभीर पण पुणेकर मटण घेण्यास खंबीर, PHOTOS
यावेळी पंपमालक आबा सुर्यवंशी यांच्यासह दोन कर्मचाऱ्यांनी दरोडेखोरांनी कोयत्याने हल्ला केला. यामध्ये दोघे कर्मचारी जखमी झाले आहेत.
कर्मचाऱ्यांवर हल्ला करून दरोडेखोर पळून चालले होते. यादरम्यान नागरिकांनी पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पाठलाग करत दरोडेखोरांनी दोन हात केले. यावेळी एका दुचाकीवर एक जण पळून जाण्यात यशस्वी झाले. तर एक दुचाकी बंद पडल्याने स्थानिकांनी दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
जुन्ररमधून राष्ट्रवादीला दु:खद धक्का, कोरोनामुळे ज्येष्ठ नेत्याचे निधन
यावेळी दोघा चोरट्यांनी पंपमालकाकडून सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याचे लॉकिट, मोबाईल आणि रोख रक्कम लंपास केली आहे.
सापडलेल्या दोघा चोरांना जमावाने मारहाण केल्याने त्यांना प्राथमिक उपचारासाठी आणि जखमी झालेल्या दोघा कर्मचाऱ्यांना कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
यातील एका गंभीर जखमी आरोपीचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरोड्याची नोंद कळवण पोलीस स्थानकात करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आहेत.