पुणे तिथे काय उणे असं उगाच म्हटलं जात नाही. कोरोनाची परिस्थितीत हाताबाहेर चालल्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाउन लागू करण्यात आला. पण, आषाढ अमावस्या, त्यात रविवार आणि लॉकडाउन मधून मिळालेली निर्बंध शिथिलता..मग काय पुणेकरांनी सकाळपासूनच आखाड साजरा करायला मटण, चिकनची दुकाने गाठली.
मटण, तसा मांसाहारी खवय्यांच्या अगदीच जिव्हाळ्याचा विषय. मटणाचे नाव उच्चारले, तरी झणझणीत मसाला घालून बनवलेल्या चविष्ठ मटणाचे ताट डोळ्यासमोर तरळते, तोडांला अक्षरशः पाणीही सुटते.
काही भागात शारीरिक अंतर पाळून तर काही ठिकाणी गर्दी करून मात्र मास्क घालून किंवा रुमाल बांधून पुणेकर बाहेर पडले.
पुण्यात अनेक ठिकाणी महिला आणि पुरुषांची मटनासाठी रांगा लावल्यात. पुढे लॉकडाउन कायम असल्यामुळे पुणेकरांनी आजच्या दिवशी एकच गर्दी केली.
श्रावण महिन्यात मास खाणं वर्ज्य असत त्यामुळे आज मटण खाण्याचा शेवटचा दिवस असल्याने आज मटणाच्या दुकानांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या.
कडक लॉकडाऊन मुळे 5 दिवस घरी कोंडून बसावं लागलं होतं पुन्हा उद्यापासून 4 दिवस सकाळी 8 ते 12 फक्त भाजीपाला आणि किराणा मिळणार म्हणून खवय्ये, मांसाहार प्रेमी आडवा हात मारायला सज्ज झाले आहे.
तर गटारी करता ठाणेकरांनी पाळले सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळले. ठाण्यात मासांहार घेण्यास ठाणेकरांच्या रांगा लागल्या आहे.
ठाण्यातील अनेक मासांहार दुकानात अगदी शिस्तबद्ध पद्धतीने ठाणेकर रांगा लावून मासांहार खरेदी करत होते.
तर कोल्हापूरमध्ये आखाडी निमित्त मटन खरेदीला गर्दी पाहण्यास मिळाली. शहरातल्या अनेक मटन शॉप समोर ग्राहकांची गर्दी होती.
उद्यापासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात कडकडीत लॉकडाउन लागू होणार आहे. त्यामुळे आज मटण, चिकन, मासे खरेदीला ग्राहकांनी एकच गर्दी केली.