मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Video: नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचं अपहरण, CCTV च्या आधारे काहीच तासात पोलिसांनी शोधलं

Video: नालासोपारा रेल्वे स्थानकातून चिमुकल्याचं अपहरण, CCTV च्या आधारे काहीच तासात पोलिसांनी शोधलं

सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्ये

सीसीटीव्हीत कैद झालेली दृश्ये

नालासोपारामध्ये दिवसाढवळ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Palghar, India

पालघर, 26 ऑगस्ट : वर्धा जिल्ह्यात शाळेत जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वी समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारा रेल्वे स्थानकातून भरदिवसा साडेतीन वर्ष चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

नालासोपारामध्ये दिवसाढवळ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याचे अपहरण केल्याची तक्रार करण्यात आली होती. नालासोपारा रेल्वे स्थानक मधील फलाट क्रमांक ४ वरुन आई वडिलांचे नजर चुकलेला चिमुकला खेळता खेळता एका दाम्पत्याच्या नजरेत आला. मात्र, त्या दाम्पत्याने अपहरणाचा उद्देश नसल्याचे तुळींज पोलिसांना सांगितले. तरी याप्रकरणी वसई रोड पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने तुळींज पोलिसांनी त्यांना वसई रोड लोहमार्ग पोलिसांना सुपूर्त केले आहे.

दृश्ये सीसीटीव्हीत कैद - 

सीसीटीव्ही कॅमऱ्यात ही दृश्ये कैद झाली होती. यात त्या चिमुकल्या तुळीज पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या दिशेने जाताना दिसला होता. यानंतर डीसीपी संजयकुमार पाटील यांनी तत्काळ सूत्रे हलवली आणि काही तासाच्या आत तुळींज गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुलाला शोधून काढले आणि पालकांच्या स्वाधीन केले. याचा पुढील तपास वसई रोड लोहमार्ग पोलीस करणार असल्याचे तुळींज पोलिसांनी सांगितले.

वर्ध्यातही चिमुकलीचे अपहरण अन् नंतर अत्याचार -

वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवला. यानंतर तिचे अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. ही घटना तीन दिवसांपूर्वी घडली. पीडिता ही दररोज प्रमाणे घरुन शाळेत जाण्यासाठी निघाली होती. मात्र, शाळेत जात असतानाच तिला सुमेध मेश्राम नामक युवक आणि एका अनोळखी युवकाने आवाज दिला. पीडिता ही शाळे समोरील प्रवेशद्वाराजवळ थांबली असता आरोपी नराधम सुमेध याने चाकूचा धाक दाखवला.

हेही वाचा - वर्धा : 7 वर्षाच्या नातीवर 70 वर्षांच्या वासनांध आजोबाकडून लैंगिक अत्याचार, घटनेने खळबळ

यानंतर तिला जबरदस्ती चारचाकी वाहनात जबरदस्ती खेचत नेत बसवले. यानंतर अनोळखी युवकाने चारचाकी समोर नेली. पीडिता ही आरडाओरड करीत होती. पण, कारच्या काचा बंद होत्या. सुमेधने पीडितेवर धावत्या कारमध्येच बळजबरी अत्याचार केला. तसेच ही बाब कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

First published:
top videos

    Tags: Cctv, Nalasopara