वर्धा, 26 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस अत्याचार तसेच गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी शाळेतून विद्यार्थिनीचे अपहरण करुन धावत्या गाडीत 13 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच वर्धा जिल्ह्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 70 वर्षीय नराधम आजोबाने एका 7 वर्षांच्या चिमुकल्या नातीवर अत्याचार केल्याची 25 रोजी समोर आली. काय आहे संपूर्ण प्रकरण - आजोबा आणि नातीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना वर्धा शहरात 25 रोजी रात्रीच्या सुमारास उघड झाली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी आरोपी नराधम आजोबाला अटक केली आहे. महिलेच्या पतीचा दोन वर्षांपूर्वी सर्पदंश झाल्याने मृत्यू झाला आहे. त्यामुळे मागील दीड वर्षांपासून ही महिला आणि तिच्या सात वर्षीय मुलगीसोबत रामनगरमध्ये तिच्या आई-वडिलांकडे राहते आहे. 25 रोजी रात्रीच्या सुमारास सगळे घरी असताना अचानक चिमुरडीच्या आजीचा ओरडण्याचा आवाज आला. चिमुरडीच्या आईने धाव घेतली असता आपल्याच पोटच्या मुलीवर वडिलांना अत्याचार करताना पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हा 70 वर्षीय नराधम त्याच्या खोलीत या 7 वर्षाच्या चिमुरडीसोबत अनैसर्गिक कृत्य करत होता. यानंतर पीडितेच्या आईने थेट रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आणि याप्रकरणी घडलेला प्रकार सांगत तक्रार दाखल केली. तर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपीला अटक केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा - धक्कादायक! घरातल्या किरकोळ भांडणावरून नवऱ्याने बायकोला जाग्यावर संपवले तीन दिवसांपूर्वीही घडली धक्कादायक घटना - वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव शहरात शाळेत जात असतानाच नराधम दोघांनी एका बालिकेचे चाकूचा धाक दाखवला. यानंतर तिचे अपहरण करीत कारमध्ये बसवून धावत्या गाडीत लैंगिक अत्याचार केला. या घटनेने एकच खळबळ उडली असून समजमन सुन्न पडले आहे. या घटनेची माहिती पुलगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पुलगाव पोलिसांनी दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.