अद्वैत मेहता (प्रतिनिधी)पुणे, 06 जानेवारी: पुणे शहराच्या बानेर परिसरातील 12 मजली इमारतीमध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग पॅन कार्ड क्लब इमारतीत लागल्याची माहिती मिळत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर बार आणि रेस्टॉरंट आहे. आगीचं कारण मात्र अद्याप समोर आलं नाही. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठले आहेत. या आगीत सध्यातरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळू शकली नाही.
पुण्यात भीषण आग pic.twitter.com/G69jOu59BR
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) January 6, 2020
जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.