लग्नाचं आमिष दाखवून 73 वर्षीय वृध्दाला घातला गंडा; 1 कोटीहून अधिक रकमेसह महिला फरार

लग्नाचं आमिष दाखवून 73 वर्षीय वृध्दाला घातला गंडा; 1 कोटीहून अधिक रकमेसह महिला फरार

शालिनी सिंग नावाच्या महिलेनं लग्नाच्या बहाण्याने मैत्री करत त्यांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. डिसूझा यांनी ही तक्रार 2020 मध्ये दाखल केली होती.

  • Share this:

मुंबई, 8 मार्च : मुंबईतील (Mumbai) एका वयोवृध्द व्यक्तीला एका महिलेनं लग्नाचं आमिष (promised to marry) दाखवून 1.3 कोटी रुपयांची लूट केली आहे. महिलेने या व्यक्तीकडून लग्न करण्यासाठी आणि म्हातारपणात त्यांची देखभाल करण्यासाठी पैसे मागितले होते. या प्रकरणी या व्यक्तीनं तक्रार दाखल केली असून पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

मालाडच्या मालवणीमध्ये राहणाऱ्या जेरॉन डिसूझा यांनी अंधेरी पोलिस (Andheri Police) ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये त्यांनी शालिनी सिंग नावाच्या महिलेनं लग्नाच्या बहाण्याने मैत्री करत त्यांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. डिसूझा यांनी ही तक्रार 2020 मध्ये दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे अंधेरी पोलिसांनी गुरुवारी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हिंदुस्तान टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार, डिसूझा यांनी दाखल केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की, त्यांनी गेल्या वर्षी हे पैसे शालिनी सिंग या महिलेच्या अकाउंटवर ट्रान्सफर केले होते. महिलेनं त्यांना आश्वासन दिलं होतं आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या पैशांची गुंतवणूक करणार असल्याचं सांगितलं होतं. या व्यवसायातून होणारा नफा दोघांमध्ये वाटून घेऊ असं देखील तिनं सांगितलं होतं.

(वाचा - Women's Day Special:'ती'च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO)

काय आहे प्रकरण -

2010 मध्ये डिसूझा यांनी सांताक्रुझमधील डोमेस्टिक एअरपोर्टजवळचा वडिलांचा भूखंड विकला होता. या व्यवहारात त्यांना विक्री किंमतीच्या 20 टक्के म्हणजे 2 कोटी रुपये मिळाले होते. त्यांनी शालिनी सिंग काम करत असलेल्या खासगी बँकेमध्ये चार फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट काढून पैशांची गुंतवणूक केली होती.

2019 मध्ये डिसूझा यांना फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाची मोठी रक्कम मिळाली. त्यानंतर शालिनी सिंगने डिसूझा यांच्याशी मैत्री केली. त्यानंतर ते दोघं वारंवार भेटू लागले. नेहमी दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठी ते हॉटेलमध्ये जायचे, असं एका पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं.

(वाचा - ‘या’ पद्धतीनं मिळवा नव्या कारवर 5 टक्के सूट, नितीन गडकरींनी सांगितला मार्ग)

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, पैसे मिळाल्यानंतर शालिनी सिंगने डिसूझा यांच्याशी संपर्क तोडला आणि पैसे घेऊन फरार झाली. तिने दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलाचा आरोप केला जात आहे. डिसूझा यांना आपल्यासोबत फसवणूक झाल्याचं कळालं तेव्हा त्यांनी याप्रकरणी बँकेजवळ असणाऱ्या अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

(वाचा - Alert! बनावट FASTag बाबत वेळीच सावध व्हा; अशी करा तक्रार)

दरम्यान, दिल्लीत देखील अशाच प्रकारची घटना घडली होती. एका महिलेची कॉलेजच्या विद्यार्थिनीने फसवणूक केली होती. दिल्लीच्या नेहरु विहारमध्ये राहणाऱ्या वयोवृध्द महिलेनं शेजारी राहणाऱ्या मुलीकडे पैशांच्या व्यवहारासाठी आणि मोबाइल मॅनेजमेंटसाठी मदत मागितली होती. नोव्हेंबर 2019 ते मार्च 2020 या कालावधीत अनधिकृत व्यवहार झाल्याची माहिती वृध्द महिलेच्या मुलाला मिळाली. त्यानंतर त्याने याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली. या मुलीने तब्बल 2,38,000 रुपयांची फसवणूक केली होती. याप्रकरणी मुलीला अटक करण्यात आली.

First published: March 8, 2021, 2:44 PM IST

ताज्या बातम्या