• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • 300 पोलीस घेत होते त्या सोनसाखळी चोराचा शोध; अखेर ड्रोनच्या मदतीने लावला छडा, गोळीबारात संशयित ठार

300 पोलीस घेत होते त्या सोनसाखळी चोराचा शोध; अखेर ड्रोनच्या मदतीने लावला छडा, गोळीबारात संशयित ठार

300 पोलीस कर्मचारी साखळी चोरीच्या संशयितांला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र तरीही साखळी चोर पकडले गेले नाही. अखेर ड्रोन कॅमेरे त्यांच्यामागे लावून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली

 • Share this:
  चेन्नई 12 ऑक्टोबर : चेन्नईमध्ये पोलीस आणि साखळी चोर यांच्यातील चकमकीचे एक अजब प्रकरण समोर आले आहे. यात 300 पोलीस कर्मचारी साखळी चोरीच्या संशयितांला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र तरीही साखळी चोर पकडले गेले नाही. अखेर ड्रोन कॅमेरे त्यांच्यामागे लावून त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली (Chain Snatching Suspect Tracked by Drones). शेवटी पोलिसांनी यातील एकाला गोळ्या घालून ठार केलं (Suspected Chain Snatcher Shot Dead). ही घटना सोमवारची आहे. या चकमकीत साखळी चोरी करणाऱ्या संशयिताच्या साथीदारालाही अटक करण्यात आली आहे. दोघेही झारखंडचे रहिवासी होते आणि चेन्नईमध्ये काम करायचे, असं पोलिसांचं म्हणणे आहे. नवऱ्याने आत्महत्या केली तर सासऱ्याने सुनेला दिला भयावह मृत्यू साखळी चोरीच्या दोन्ही संशयितांनी आपल्यावर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर प्रत्युत्तरात्मक कारवाई करण्यात आली असल्याचं पोलिसांनी म्हटलं. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, दोन्ही चोर शस्त्रास्त्रांनी सज्ज होते आणि त्यांनी चोरी करण्यासाठी हवेत गोळीबारही केला होता. पोलिसांनी सांगितलं, की श्रीपेरंबुदूर येथील टोल प्लाझाजवळ 55 वर्षीय महिलेची साखळी चोरून दोन्ही आरोपी पळून जात होते. जेव्हा महिलेने ओरडण्यास सुरुवात केली तेव्हा दोघांनी हवेत गोळीबारही केला होता. त्यानंतर पोलिसांची टीम तयार करून दोन्ही आरोपींचा शोध घेतला जात होता. पोलिसांनी सांगितलं की, मृतकाचे नाव मुर्थसा असे आहे. तर त्याच्या साथीदाराचं नाव अख्तर असं आहे. चिमुकलीच्या गळ्यात बापाने अडकवली साडी, त्रिशुळाने करत होता वार आणि तेवढ्यात.... पोलिसांचं असं म्हणणं आहे, की आम्हाला असा संशय आहे की ४ ऑक्टोबरला घडलेल्या घटनेतही याच दोघांचा हात आहे. या घटनेत एक सरकारी कर्मचारी गोळी लागल्यानं जखमी झाला होता.
  Published by:Kiran Pharate
  First published: