मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /बाळाला ना आई राहिली ना बाप; नवऱ्याने आत्महत्या केली तर सासऱ्याने सुनेला दिला भयावह मृत्यू

बाळाला ना आई राहिली ना बाप; नवऱ्याने आत्महत्या केली तर सासऱ्याने सुनेला दिला भयावह मृत्यू

या दांम्पत्याला 8 महिन्यांची मुलगीदेखील आहे. आता तर बाळाला ना आई राहिली ना बाप..

या दांम्पत्याला 8 महिन्यांची मुलगीदेखील आहे. आता तर बाळाला ना आई राहिली ना बाप..

या दांम्पत्याला 8 महिन्यांची मुलगीदेखील आहे. आता तर बाळाला ना आई राहिली ना बाप..

मेरठ, 11 ऑक्टोबर : इंटीरियर डिजाइनर अमित बंसल याच्या आत्महत्येनंतर (Suicide) नोएडातील जेपी रुग्णालयात जन्म-मृत्यूशी झुंज देणारी पत्नी पिंकीने रविवारी जीव सोडला. ती व्हेंटिलेटरवर होती. कुटुंबाला आशा होती की, त्यांची मुलगी बरी होईल. मात्र रविवारी तिचा मृत्यू (Murder) झाला. या प्रकरणात सासरा (Father in law killed daughter in law) रामकिशल याला अटक करण्यात आली असून त्यानेही आपला गुन्हा कबुल केला आहे.

पहिल्यांदा लाथेने मारलं मग गळा कापला..

आरोपी सासरा रामकिशन याने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याने सांगितलं की, त्याचा मुलगा अमित बंसल आणि सून पिंकी यांच्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून खूप भांडणं सुरू होती. यामुळे अमित तणावात होता. यादरम्यान 4 ऑक्टोबर रोजी त्याने आपल्या ऑफिसात गळफास लावून आत्महच्या केली होती. पतीचा मृतदेह पाहून पिंकीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दुसरीकडे मुलाच्या मृत्यूनंतर रामकिशन हा संपत्प झाला होता. त्याने पहिल्यांदा सूनेला लाथेने मारहाण केली त्यानंतर कटरने तिचा गळा कापला. ज्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. येथे तिचा मृत्यू झाला.

हे ही वाचा-बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू

CCTV मधून धक्कादायक माहिती उघड

शास्त्रीनगर सेक्टर-1 येथे राहणारा अमित बंसल इंटीरियर डेकोरेटर होता. 4 ऑक्टोबर दुपारी अमितने कार्यालयात गळफार घेऊन आत्महत्या केली. पतीचा मृतदेह पाहून पिंकीनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. तिने हात, मानेवर कटरने वार केले. रक्ताळलेल्या अवस्थेत पिंकी जमिनीवर पडली होती. यादरम्यान अमितचे वडील रामकिशन बंसल घरी पोहोचले. पिंकीला वाचविण्याऐवजी त्यांनी तिच्या गळ्यावर अनेक वार केले. हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाला आहे. या आधारावर पोलिसांनी हत्येचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. आणि 8 ऑक्टोबर रोजी रामकिशन बंसल याला अटक करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी रामकिशन याने आपला गुन्हा कबुल केला. सुरुवातीला तो पोलिसांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर त्याने सर्व सत्य माहिती सांगितली.

अमित बंसल याला प्रेम विवाह करायचा हवा. मात्र त्याच्या वडिलांनी जबरदस्तीने त्याचं लग्न पिंकीसोबत लावून दिलं. पिंकीदेखील इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत  होती. 2018 मध्ये दोघांचं लग्न पार पडलं. पिंकीच्या वडिलांनी मुलीला हुंड्यात मर्सिडीज गाडी दिली होती. या दोघांना 8 महिन्यांची (The baby has no mother or father) एक मुलगीदेखील आहे.

First published:

Tags: FAMILY, Murder, Suicide case