भोपाळ, 11 ऑक्टोबर : आपल्या मुलीला गच्चीवर नेऊन तिच्या गळ्याभोवती (Father tries to kill his daughter) साडी गुंडाळणाऱ्या आणि त्रिशुळाने तिला जखमी करू पाहणाऱ्या बापाची सध्या सगळीकडं चर्चा रंगली आहे. दीड वर्षांच्या मुलीला तिच्या बापाने गच्चीवर नेलं, तिच्या (Father was about to injure daughter) गळ्याभोवती साडी गुंडाळली आणि हातात त्रिशूळ घेऊन तिला जखमी करण्याच्या बेतात होता. मात्र तेवढ्यात उपस्थितांनी घटनेची कल्पना (Citizens called police) पोलिसांना दिली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
मुलीला नेले गच्चीवर
मध्यप्रदेशातील रायसेनमध्ये राहणारा 35 वर्षीय जगदीश कुशवाहने आपल्या पत्नीजवळ झोपलेल्या दीड वर्षांच्या मुलीला उचललं आणि तिला छतावर घेऊन गेला. छतावर नेल्यावर त्यानं मुलीच्या गळ्याभोवती साडी गुंडाळली आणि त्याचं दुसरं टोक आपल्या हातात पकडलं. त्याच्या एका हातात त्रिशुळासारखं एक शस्त्र होतं, ज्याने तो मुलीला इजा करण्याच्या बेतात होता. मात्र तेवढ्यात शेजाऱ्यांनी त्याला हाक मारली आणि इमारतीखाली मोठी गर्दी जमली.
जमावाला दिली धमकी
आपल्याला जे करायचंय ते करू दिलं नाही, तर आपण मुलीला खाली फेकून देऊ, अशी धमकी द्यायला जगदीशनं सुरुवात केली. त्यासाठी त्याने मुलीला काहीवेळा गच्चीवरून खाली लटकवलं. यावेळी काहीजणांनी 100 नंबर डायल करून पोलिसांना घटनेची कल्पना दिली. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेत पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी जगदीशची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
हे वाचा - बायकोसोबत नवऱ्याचं राक्षसी कृत्य; पत्नीच्या खोलीत कोब्रा सोडून दिला भयंकर मृत्यू
पोलिसांनी दाखवलं प्रसंगावधान
पोलिसांनी प्रसंगावधान राखत जगदीशला समजावण्याचा प्रयत्न केला. हळूहळू त्याच्याजवळ जात मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर जगदीशनं छतावरून खाली उडी मारली. मात्र त्यात त्याला कुठलीही विशेष इजा झाली नाही. खाली उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला पकडलं आणि अटक केली. जगदीशवर 307 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Father, Madhya pradesh, Murder Mystery