मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /आजीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून आरामात राहत होता नातू; शेजारच्यांना दुर्गंधी आल्यानंतर गुपित उघड

आजीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवून आरामात राहत होता नातू; शेजारच्यांना दुर्गंधी आल्यानंतर गुपित उघड

अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्या कारणाने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचं नातवाने सांगितलं,

अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्या कारणाने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचं नातवाने सांगितलं,

अंत्यसंस्कारासाठी पैसे नसल्या कारणाने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवल्याचं नातवाने सांगितलं,

तेलंगणा, 13 ऑगस्ट : तेलंगणातील वारगंल जिल्ह्यात एका तरुणाने आपल्या आजीच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवला. यानंतर तो आरामात घरात राहत होता. शेजारच्यांना जेव्हा त्याच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली तेव्हा त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांनी घराचा तपास केला असताना फ्रीजमध्ये वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध महिलेचं वय तब्बल 93 वर्षे होतं. ती वारंगल जिल्ह्यातील परकलमध्ये आपला नातू निखिलसोबत एका भाड्याच्या घरात राहत होती. सांगितलं जात आहे की, घरातून दुर्गंधी येत होती. शेजारच्यांना याबाबत शंका आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यादरम्यान पोलिसांच्या टीमला घरात वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. हा मृतदेह खूप दिवसांपूर्वीचा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे महिलेच्या शरीरातून दुर्गंधी येत होती. पोलिसांनी तत्काळ वयोवृद्ध महिलेच्या नातवाला ताब्यात घेतलं आहे आणि महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. आजतकने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा-Shocking! प्रेयसीच्या घरातून थेट पोहोचला रुग्णालयात,उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

पोलिसांच्या ताब्यात असलेल्या निखिलने पोलिसांना सांगितलं की, चार दिवसांपूर्वी आजारी असल्यामुळे आजीचा मृत्यू झाला होता. त्याच्याजवळ अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते. यासाठी आजीचा मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला. मात्र अद्यापही निखिलच्या कहाणीवर पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. ते या प्रकरणात अधिक तपास करीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निखिलचे आई-वडिलांचं एका रस्ते अपघातात निधन झालं होतं. ज्यानंतर तो आपल्या आजीसोबत राहत होता. एकाच वेळी आई-वडिलांच्या मृत्यूमुळे त्याच्यावर मानसिक परिणाम झाला होता. पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास केला जात आहे. वयोवृद्ध महिलेचा मृत्यू संशयास्पद असल्याचं इन्स्पेक्टर महेंद्र रेड्डी यांनी सांगितलं.

First published:

Tags: Crime news, Murder, Telangana