मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /6 सुना करूनही नाही मिळाला वंशाचा दिवा; भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात नवा खुलासा

6 सुना करूनही नाही मिळाला वंशाचा दिवा; भाच्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या प्रकरणात नवा खुलासा

Crime in Beed: वंशाला दिवा मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील एका गावात आला आहे. येथील एका महिलेनं वंशाला दिवा मिळावा म्हणून सुनेचा अमानुष छळ (Inhuman persecution) केला आहे.

बीड, 14 ऑगस्ट: वंशाला दिवा मिळवण्यासाठी एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील एका गावात आला आहे. बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील जळगाव येथील रहिवासी असणाऱ्या महिलेनं वंशाला दिवा मिळवण्यासाठी आपल्या सुनेला चक्क भाच्यासोबत शारिरीक संबंध (Immoral Relationship with Nephew) ठेवण्यास भाग पाडलं आहे. पीडित सुनेनं अनैतिक संबंधासाठी नकार दिला असताना आरोपी सासूनं पीडितेचा अमानुष छळ (Inhuman persecution) केला आहे. पीडितेच्या हाताला चटके देत, तीन तीन दिवस उपाशी ठेवलं आहे.

तर नराधम भाच्यानं धारदार शस्त्राचा धाक दाखवत विवाहितेवर वारंवार बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडितेनं 2 ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पण तत्पूर्वी पीडितेला तीन दिवस पोलीस ठाण्याच्या चकरा माराव्या लागल्या आहेत. यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीला आणि सासऱ्याला अटक केली असून त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण नराधम भाच्यासह मुख्य आरोपी सासू अद्याप फरार आहे.

हेही वाचा-आर्मी ऑफिसर असल्याचं सांगत करायचा ऑनलाईन चॅटिंग; अनेक तरुणींना गळाला लावलं

नेमकं प्रकरण काय आहे?

आष्टी तालुक्यातील जळगाव येथील कडा कारखाना परिसरात एक कुटुंब वास्तव्याला आहे. संबंधित कुटुंबात तीन मुलं आणि आईवडील असा परिवार आहे. हे कुटुंब नंदीबैल घेऊन भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवते. संबंधित तिन्ही मुलं विवाहित असून घरी पाळणा हलत नव्हता. घराला वंशाला दिवा पाहिजे या हट्टातून संबंधित महिलेनं  आपल्या तीन मुलांचे तब्बल सहा विवाह केले. तरीही तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही.

हेही वाचा-बायकोच्या इच्छेविरुद्ध शरीरसंबंध ठेवणं बेकायदेशीर नाही - कोर्ट

पण तिसऱ्या मुलाच्या दुसऱ्या पत्नीनं टेस्ट ट्यूब बेबी द्वारे एका मुलीला जन्म दिला. मात्र सासूला वंशाच्या दिवाच पाहिजे होता. त्यामुळे तिने आपल्या सुनेला आपल्या भाच्यासोबत अनैतिक संबंध ठेवायला भाग पाडलं आहे. अनैतिक संबंधासाठी नकार दिल्यानं आरोपीनं पीडितेवर अमानुष अत्याचार केले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधम भाचा आणि मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Crime news, Rape