जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / महिला आमदाराची दादागिरी; भाच्याची गाडी अडवल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली

महिला आमदाराची दादागिरी; भाच्याची गाडी अडवल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली

महिला आमदाराची दादागिरी; भाच्याची गाडी अडवल्यानं पोलिसाच्या कानशिलात लगावली

या कॉन्स्टेबलनं आमदाराच्या (MLA) भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त महिला आमदाराने कॉन्स्टेबलला चापट मारली.

  • -MIN READ
  • Last Updated :

जयपूर 15 जून: एका महिला आमदारावर हेड कॉन्स्टेबलला (Head Constable) मारहाण केल्याचा आरोप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कॉन्स्टेबलनं आमदाराच्या (MLA) भाच्याची गाडी थांबवून त्याला दंड ठोठावल्याचं समोर आलं आहे. याच कारणामुळे संतप्त महिला आमदाराने कॉन्स्टेबलला चापट मारली. याप्रकरणी पोलिसांनी महिला आमदारावर गुन्हा दाखल केला आहे. हे प्रकरण राजस्थानच्या (Rajasthan) बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगड येथील आहे. येथील अपक्ष महिला आमदार रमिला खरिया यांना आपल्या भाच्याला अडवून दंड ठोठावल्याचा इतका राग आला की त्यांनी कॉन्स्टेबललाच चापट मारली. या हेड कॉन्स्टेबलचं नाव महेंद्र नाथ सिंह असं असून त्यांनी महिला आमदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मित्रांसोबत शारिरीक संबंध ठेवण्यास दिला नकार, तरुणाचं प्रेयसीसोबत अमानुष कृत्य हेड कॉन्स्टेबल महेंद्र नाथ यांनी सांगितलं, की नाकाबंदी असल्यानं दुचाकीवरुन जात असलेल्या सुनील बारिया याला पोलिसांनी अडवलं. कोरोनामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून येणा-जाणाऱ्या लोकांची चौकशी केली जात आहे. मात्र, पोलिसांनी दुचाकी थांबवताच सुनीलला राग आला आणि तो पोलिसांची कॉलर पकडून त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्याची धमकी देऊ लागला. यामुळे हेड कॉन्स्टेबलनं त्याला दंड ठोठावला. याची तक्रार सुनीलनं आमदार रमिला यांच्याकडे केली. यानंतर महिला आमदारानं कॉन्स्टेबलला चापट लगावली. अजब शिक्षा! आदिवासी महिलेला नग्न करून गावभर फिरवलं, वाचा काय आहे प्रकरण या प्रकरणी महेंद्र नाथ यांनी आमदारावर गुन्हा नोंदवण्याविषयी बोलले असता स्टेशन प्रभारी प्रदीप कुमार यांनी त्यांना महिला आमदाराची माफी मागण्यास सांगितले. यावर महेंद्र यांनी नकार दिला. नंतर इतर पोलीस महेंद्रच्या समर्थनार्थ उभे राहिले आणि संपावर गेले तसंच त्यांनी जेवण करण्यास नकार दिला. अखेर पोलिसांनी आमदाराविरोधात गुन्हा दाखल करून घेतला. सोबतच महेंद्र नाथ विरोधातही केस दाखल करण्यात आली, कारण आमदाराविरोधात तक्रारीचा तपास सीबीसीआयडी करतं, त्यामुळे हे प्रकरण सीबीसीआयडीकडे सोपवण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात