जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / Dasara Melava 2022 : ठाण्यात आक्षेपार्ह शब्दात घोषणा, ठाकरे गटातील शिवसैनिकांवर कारवाई

Dasara Melava 2022 : ठाण्यात आक्षेपार्ह शब्दात घोषणा, ठाकरे गटातील शिवसैनिकांवर कारवाई

Dasara Melava 2022 : ठाण्यात आक्षेपार्ह शब्दात घोषणा, ठाकरे गटातील शिवसैनिकांवर कारवाई

ठाणे पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • -MIN READ Thane,Maharashtra
  • Last Updated :

ठाणे, 7 ऑक्टोबर : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर या दोन्ही गटांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळत आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी शिंदे गटातील शिवसैनिकांनी ठाकरे गटातील महिला शिवसैनिकांना अश्लिल इशारे केल्यानंतर या शिवसैनिकांना चोप देण्यात आला होता. यानंतर आता आणखी एक बातमी ठाण्यातून समोर आली आहे. आता ठाकरे गटातील शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आक्षेपार्ह घोषणा केल्याने ठाणे शहर पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या. “निम का पत्ता कडवा है, नरेश म्हस्के …. है अशा शब्दात त्यांनी घोषणा दिल्या होत्या. यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ठाण्यातील चिंतामणी चौक येथुन रॅली निघाली होती. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क येथे जाण्यास खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्त्वात ही रॅली निघाली होती. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी नरेश म्हस्के यांच्या विरोधात घोषणा केल्या होत्या. “निम का पत्ता कडवा है, नरेश म्हस्के …. है अशा शब्दात त्यांनी घोषणा दिल्या होत्या. हेही वाचा -  VIDEO: ठाकरे-शिंदे गट पुन्हा आमनेसामने; ठाण्यात शाखेच्या चावीवरुन राडा यामुळे ठाणे पोलिसांनी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूण 14 शिवसैनिकांवर हा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक मुंबई महामार्गावरही झालेला राडा - दरम्यान नाशिक मुंबई महामार्गावरही शिवसेना गट आणि शिंदे गटात राडा झाला होता. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी चोप दिला. चालत्या वाहनातून अश्लील इशारे केले, असा आरोप महिला शिवसैनिकांनी केला. यामुळे अश्लील इशारे केल्याचा कारणावरून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून रस्त्यातच चोप दिला होता. ही घटना दसऱ्याच्या दिवशी नाशिक मुंबई महामार्गावरील शहापूर जवळ घडली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात