मुंबई 22 जून : चित्रपटसृष्टीतील मेकअप आर्टिस्ट सारा यंथन राहत्या घरी मृतावस्थेत आढळली होती. खार दांडा येथे भाड्याने राहत असलेल्या फ्लॅटमध्ये मंगळवारी रात्री 26 वर्षीय मेकअप आर्टिस्टचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या स्थितीत सापडला होता. याप्रकरणात आता तिचा प्रियकर दानिश कश्यप याचा शोध घेतला जात आहे. दानिश कश्यप यानेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यावरुन पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल केला आहे. पोलीस सध्या दानिशचा शोध घेत आहेत. आत्महत्येआधी साराने लिहिलेली सुसाईड नोड सापडल्यानंतर संबंधित कारवाई करण्यात आली. सारा ही कश्यपसोबत गेल्या 2-3 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होती. कश्यप बँकर होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोघांनी लग्न करण्याचाही निर्णय घेतला होता. ते खार येथेच लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्येही राहू लागले होते. Crime News : उडाल्या रक्ताच्या चिळकांडया; मुंबईत धावत्या रिक्षात गर्लफ्रेंडचा चिरला गळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघंही खार दांडा येथील भाड्याच्या फ्लॅटमध्यये राहू लागले. मात्र मागील काही दिवसांपासून या जोडप्यात सतत भांडणं होत होती. यानंतर कश्यपने सारासोबतचं नातं तोडलं. तरुणीने त्याच्याशी संपर्क साधण्याचा अनेकदा प्रयत्न केला. मात्र कश्यपने तिच्या कॉल आणि मेसेजला कोणताही रिप्लाय दिला नाही. यानंतर नाराज होऊन साराने आपला जवळचा मित्र करीमला मेसेज पाठवून याबाबतची माहिती दिली. यात तिने लिहिलं, की ‘माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. मी माझं जीवन संपवत आहे. माझ्या मृत्यूसाठी तोच जबाबदार आहे’. मिळालेल्या माहितीनुसार , साराने हा मेसेज आपल्या मित्राला रविवारी रात्री उशिरा पाठवला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.