मुंबई, 20 जून : महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुण्यातील एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या 26 वर्षीय दर्शना पवारच्या हत्येनंतर मुंबईतून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. धावत्या रिक्षेतून एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडचा गळा चिरून हत्या केल्याचा भीषण प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीचं नाव दीपक बोरसे असून गर्लफ्रेंडची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:लाही संपवण्याचा प्रयत्न केला. मृत तरुणीचं नाव पंचशीला अशोक जामदार असून ती चांदिवली येथील संघर्ष नगर येथे राहत होती. रिक्षेत बसलेले असता काही कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. या वादानंतर तरुणीने पंचशीलाचा गळा चिरला. ही घटना साधारण दुपारच्या वेळेत साकीनाका भागात घडली. धावत्या रिक्षेत तरुणीचा गळा धारदार शस्त्राने चिरण्यात आला. यानंतर स्वत:ला वाचवण्यासाठी ती रिक्षेच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र फार लांब जाऊ शकली नाही. यानंतर तरुणाने स्वत:च्या मानेवरही सुरा फिरवण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार पादचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर दोघांनाही जवळील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र पंचशीलाला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं. दरम्यान आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून त्याच्याविरोधात आयपीसी 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Mumbai Mira Road Murder : सरस्वतीच्या विवस्त्र मृतदेहासोबत नग्न होऊन काढले फोटो; सेक्स अॅडिक्ट सानेनं गाठला विकृतीचा कळस दर्शनाचा मृत्यू कसा झाला? पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दर्शनाचा तपास सुरू केला असता, तिचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळून आला होता. दरम्यान आता दर्शनाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार दर्शनाच्या डोक्यावर आणि शरीरावर जखमा आढळल्या आहेत, यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच पोलिसांनी या प्रकरणात अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात पोलिसांचा संशय हा दर्शनाचा मित्र राहुल याच्यावर आहे. तो देखील बेपत्ता असून, त्याच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी 5 पथकं तैनात केली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.