मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पेट्रोल टाकून पेटवली स्वतःचीच कार, कारण वाचून लावाल डोक्याला हात

पेट्रोल टाकून पेटवली स्वतःचीच कार, कारण वाचून लावाल डोक्याला हात

 एका नागरिकानं स्वतःचीच (Car owner burned his own car after fight with recovery agents) कार पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे.

एका नागरिकानं स्वतःचीच (Car owner burned his own car after fight with recovery agents) कार पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे.

एका नागरिकानं स्वतःचीच (Car owner burned his own car after fight with recovery agents) कार पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे.

ग्वालियर, 11 नोव्हेंबर: एका नागरिकानं स्वतःचीच (Car owner burned his own car after fight with recovery agents) कार पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीच्या रागाचा इतका भडका उडाला की त्याने स्वतःच स्वतःच्या कारवर (Put petrol on car and set it on fire) पेट्रोल टाकलं आणि काडी पेटवून तिचा भडका उडवून दिला. कारचे हफ्ते न भरल्यामुळे रिकव्हरीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर त्याने हा निर्णय़ घेतला.

कारचे हफ्ते थकले

मध्यप्रदेशातील ग्वालियरमध्ये राहणाऱ्या एका कारमालकानं रागाच्या भरात स्वतःचीच कार पेटवून दिली. त्यानं कर्ज काढून ही कार विकत घेतली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून तो कारचे हफ्ते भरू शकत नव्हता. त्यामुळे फायनान्स कंपनीकडून रिकव्हरीसाठी कर्मचारी आले होते. कर्जाचे हफ्ते न भरल्यामुळे त्याची कार उचलून नेण्याच्या उद्देशानं ते तिथँ आले होते.

कर्मचाऱ्यांसोबत झाला वाद

या कर्मचाऱ्यांसोबत कार मालकाचं कडाक्याचं भांडण झालं. लॉकडाऊन आणि इतर संकटांमुळे आपण ईएमआय भरू शकलो नाही, असं कारमालकाने त्यांना सांगितलं. तर कारणांशी आपल्याला देणंघेणं नसून आपण कार घेऊन जाणार असल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं. यावरून दोघांमध्ये शाब्दिक वादावादीला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात भांडण विकोपाला गेलं.

पेटवली स्वतःचीच कार

कार कशी घेऊन जाता, ते पाहतो असं म्हणत कारच्या मालकाने कारवर पेट्रोल ओतलं. त्यानंतर काडी पेटवून कारला आग लावली. या आगीत कार जळून तिचं नुकसान झालं. कार कशी घेऊन जाता, तेच पाहतो, अशी तंबी देत इरेला पेटलेल्या कार मालकानं स्वतःचीच कार पेटवली. या घटनेचा व्हिडिओ तिथं उपस्थित असणाऱ्या काहीजणांनी रेकॉर्ड केला.

हे वाचा-एकाच शहरात 21 हजार हॉटस्पॉट, ते देखील FREE! गिनीज बुकमध्ये झाली नोंद

पोलिसांनी केली कारवाई

ही घटना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गाडीला लागलेली आग विझवण्यात आली असून यात कारचं प्रचंड नुकसान झालं आहे. घटनेनंतर कारचा मालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Burning car, Loan, Police